मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:58 PM2021-05-10T14:58:45+5:302021-05-10T14:59:13+5:30

मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही.

Maratha reservation was not taken seriously cm thackeray should resign Demand Vinayak Mete | मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी

मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी

Next

मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळेच सरकारच्या हाती अपयश आलं आहे. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास  आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्यानं आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं हाताळलेला नाही. त्यामुळे त्यांनीही राजीनामा देण्याची गरज आहे, असं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. 

विनायक मेटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर उघड रोखठोक हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही केंद्राच्या पाया पडतो. पण त्यांनी आरक्षण द्यावं. केंद्राच्या पाया पडण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राला द्यावा आणि पुढची कारवाई करावी, असा टोला मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असंही मेटे म्हणाले. 

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगला आहे. पण लॉकडाऊन संपताच भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही बीडमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा उघड इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. 
 

Web Title: Maratha reservation was not taken seriously cm thackeray should resign Demand Vinayak Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.