शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:52 AM2021-08-07T08:52:19+5:302021-08-07T08:53:41+5:30

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली.

Meeting between Sharad Pawar and Karnataka Chief Minister Bammai | शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा

शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा

Next

बंगळुरू : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. शरद पवार हे दाेन दिवसांच्या काैटुंबिक दाैऱ्यासाठी बेंगळुरू येथे दाखल झाले आहेत. त्यादरम्यान दाेन्ही नेत्यांची बाेम्मई यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली.  बाेम्मई यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 

चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविणार
या भेटीत दोन्ही राज्यांमधील आंतरराज्यीय पाणी प्रश्न आणि नद्यांच्या पाणीवाटपावर चर्चा झाली. याप्रश्नी नवी दिल्ली येथे लवकरच बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले. पावसाळ्यात दाेन्ही राज्यांमध्ये सीमेजवळील भागात गंभीर पूरस्थिती निर्माण हाेतेत. हा प्रश्न समन्वय आणि चर्चेच्या माध्यमातून साेडविण्यासही दाेन्ही नेत्यांनी सहमती दर्शविल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

Web Title: Meeting between Sharad Pawar and Karnataka Chief Minister Bammai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.