'भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं BSFकडून मतदाराला मारहाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 03:00 PM2019-04-11T15:00:00+5:302019-04-11T15:00:54+5:30
लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे.
जम्मू-काश्मीरः लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे. या दरम्यान बूथवर मतदारांना जोरदार गोंधळ घातला आहे. पोलिंग बूथवर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी भाजपाला मत देण्यास सांगितलं, असा आरोप या मतदारांनी केला आहे. तसेच आम्ही असं न केल्यामुळे त्या सुरक्षा जवानांनी मतदान करण्यापासून आम्हाला रोखलं आणि मारहाण केली. सुरक्षा जवानांच्या मारहाणीमुळे मतदार भडकले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे तिकडे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्या गोंधळाचा एक व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी ट्विट केला आहे.
A voter at polling booth in Jammu was manhandled by the BSF because he refused to cast his vote for BJP. Using armed forces at polling stations to coerce people to vote for the BJP shows their desperation & hunger to usurp power by hook or crook. pic.twitter.com/Hmr8zocQ44
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) April 11, 2019
व्हिडीओ ट्विट करत महेबुबा मुफ्तींनी दावा केला आहे की, एका मतदारानं भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर सशस्त्र दलाचे जवान जनतेला जोरजबरदस्तीनं भाजपाला मतदान करण्यास बाध्य करत आहेत. सरकार असं करून आपल्या हतबलतेचा परिचय देतंय. राज्यातील सुरक्षा जवानांमुळे मतदार प्रभावित होत आहेत. राज्यातील सहा जागांसाठी सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. आज दोन जागांसाठी मतदान सुरू असून, मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.