मंत्री शिंगणे यांच्या विधानाने मलिक यांचा खोटेपणा उघड; प्रसाद लाड यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:39 AM2021-04-21T05:39:22+5:302021-04-21T05:39:59+5:30
दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील ‘रेमडेसिविर’चा साठा भाजप नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते. यासंदर्भात त्यांनी माझी भेटही घेतली होती, असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वाहिनीशी बोलताना केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील ‘रेमडेसिविर’चा साठा भाजप नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते. यासंदर्भात त्यांनी माझी भेटही घेतली होती, असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वाहिनीशी बोलताना केले आहे. त्यांच्या विधानामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. संकटकाळात असे खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली.
कमिशन बुडाल्यानेच कुभांड रचले - दरेकर
मुंबई : रेमडेसिविरसाठी टेंडर मागवले गेले पण कमिशनसाठी फायनल झाले नाही म्हणून काही जणांनी कुंभाड रचून आरोपांची राळ उडविल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. फार्मा कंपनीच्या मालकाला वाझे स्टाईल अटक करण्यात आली. त्यांनाघरातून ११ पोलिसांनी उचलून पार्ला पोलिस स्टेशनमधून डीसीपी कार्यालयात नेले, असे ते म्हणाले.
गुन्हा दाखल करा : काँग्रेसची मागणी
nरेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत आहेत. राज्य सरकारलाही या इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा होत नसताना दि. ८ व १२ एप्रिल रोजी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर व नंदुरबारला हजारो इंजेक्शन्स वाटली.
nहा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खासगीरीत्या कशी वाटली? भाजप नेत्यांचे व ब्रुक फार्मा कंपनीचे रेमडेसिविरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजप नेत्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.