एनडीएतूून बाहेर पडण्याचा मिझो फ्रंटचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:37 AM2019-01-26T05:37:09+5:302019-01-26T05:37:21+5:30
मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेतले नाही तर वेळप्रसंगी आम्ही एनडीएतून बाहेर पडू असा इशारा मिझोरामचे मुख्यमंत्री व मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षाचे प्रमुख झोरामथंगा यांनी दिला आहे.
ऐझॉल : मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेतले नाही तर वेळप्रसंगी आम्ही एनडीएतून बाहेर पडू असा इशारा मिझोरामचे मुख्यमंत्री व मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षाचे प्रमुख झोरामथंगा यांनी दिला आहे.
एमएनएफने ऐबॉक या गावामध्ये आयोजिलेल्या जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार व मिझो बंडखोर यांच्यामध्ये १९८६ झालेला करार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे निरर्थक ठरू शकतो.
बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या व इथे राहात असलेल्या बिगरमुस्लिम नागरिकांना हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यास भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.