सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती?; आमदार नितेश राणेंचं गृहमंत्री अमित शहांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:52 PM2020-09-16T12:52:38+5:302020-09-16T12:57:16+5:30
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडलं आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. यानंतर कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.
या संपूर्ण घडामोडीत भाजपा नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली असं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला होता. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज होता. मात्र यानंतर या मृत्यूवर संशयाचे ढग निर्माण झाले. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेले. आता आमदार नितेश राणेंनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण एकमेकांशी लिंक आहे असा दावा केला आहे.
आमदार नितेश राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. यात दिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केली नाही. ज्या दिवशी दिशाचा इमारतीवरुन खाली पडली तेव्हा तिथे रोहन रॉय उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतरही रोहन रॉय २०-२५ मिनिटांनी फ्लॅटमधून खाली आला होता त्यामुळे त्याच्या वागणुकीवर संशय निर्माण होतो.
रोहन रॉयने मुंबई सोडून जावं यासाठी त्याला धमकी देण्यात आली असावी. मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्याला मुंबईत येण्याची भीती वाटत असावी. कोणीतरी या प्रकरणाला रोहन रॉयवर दबाव टाकून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतंय असा दावाही नितेश राणेंनी केला. त्यामुळे रोहन रॉयला केंद्र सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरुन तो मुंबईत आल्यानंतर सुरक्षित राहील. रोहन रॉय हा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य दुवा आहे. त्याच्या जबाबानंतर अनेक खुलासे बाहेर येतील. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडलं आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) September 16, 2020
सीबीआयचा तपासही संशयाच्या दिशेने
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला याचा शोध सीबीआय वेगवेगळ्या अॅंगलने घेत आहे. सुशांत १४ जूनला आपल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृत आढळून आला होता. आता या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे ज्यामुळे यात काहीतरी गडबड असण्याचा संशय येत आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार, सुशांतने १३ जूनच्या दुपारपासूनच फोन आणि मेसेजला रिप्लाय दिला नाही. सुशांतची बहीण मीतूने सुद्धा हे आधी सांगितलं होतं की, १४ जूनला सकाळी सुशांतने फोन उचलला नाही.
१३ जूनला लवकर बंद झाले लाइट
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला ही बाब अजूनही रहस्य बनून आहे. टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, १३ जूनपासूनच सुशांत मेसेज, कॉल किंवा चॅटला उत्तर देत नव्हता. तसेच सुशांतच्या शेजाऱ्यांनी सांगितले होते की, १३ जूनला त्याच्या घरातील लाइट लवकर बंद केली गेली होते. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही त्याच्या मृत्यूचा वेळ नोंदवला नसल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट
बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं
हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार
कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी
ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना