'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 02:36 PM2021-08-06T14:36:08+5:302021-08-06T14:36:25+5:30

Bala Nandgaonkar on mns-bjp alliance: आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

MNS leader Bala Nandgaonkar comment on mns and bjp alliance for upcoming elections | 'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

Next

मुंबई: 'मनसे(MNS) आणि भाजपा(BJP) भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', असं मोठ विधान मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar) यांनी केलं आहे. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray ) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजपा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता यावर बाळा नांदगावकरांच्या सूचक विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज बाळा नांदगावकर(Bala Nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे(Raj Thackeray ) आणि अमित ठाकरे(Amit Thackeray) हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल', असं नांदगावकर म्हणाले.

राजकारणात ठोकताळे असतात
नांदगावकर पुढे म्हणाले की, काहीवेळा राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करायच्या असतात. त्यासाठी काही ठोकताळे असतात, त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. शरद पवारां(Sharad Pawar)नीही ठोकताळ्याचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन केलं. आजचाही हा ठोकताळाच आहे, असंही ते म्हणाले.

'युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे'
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचं पाटलांनी सांगितलं. तसेच, युती झाली नाही तरी मैत्री राहील, असं भेटीच्या आधी चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं.
 

Web Title: MNS leader Bala Nandgaonkar comment on mns and bjp alliance for upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.