'आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांच तसंच झालयं...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:24 AM2021-07-15T10:24:28+5:302021-07-15T10:24:49+5:30
MNS leader Sandip Deshpande on Uddhav Thackeray: 'प्रश्नम' या संस्थेच्या अहवालात 13 राज्यांमधून उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत.
मुंबई: नुकतच प्रश्नम या संस्थेने त्यांचा त्रैमासिक अहवाल जाहीर केला. यात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अव्वल ठरले आहेत. यावरुन आता मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे(sadip deshpande) यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं ? असा सवालही विचारला.
संदिप देशपांडे म्हणाले की, 'आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो कधीच अभ्यास करत नव्हता, पण वर्गात पहिला यायचा. एकतर तो खूप हुशार होता किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला व्हायचा. असेच मुंख्यमंत्र्यांचेही झाले आहे,' अशा शब्दात संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्यांना टोला लगावला. तसेच, नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलं तरी काय?' असा सवालही विचारला.
सरकारला परिणाम भोगावे लागणार
सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, त्यांना गृहीत धरू नये. रुग्णसंख्या कमी झाली आहे. निर्बंध का उठवत नाही? ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. तसेच, सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार, असा इशाराही दिला. यावेळी त्यांनी लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यंना पत्र दिल्याचे सांगितले. तर, मुख्यमंत्र्यांना फक्त घरातच बसून राहायचंय. जनता सरकारवर नाराज आहेत, हे वसुली सरकार फक्त हफ्तेखेरी करतंय, असा आरोप देशपांडेंनी यावेळी केला.