Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा; “सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:10 PM2021-04-06T12:10:40+5:302021-04-06T12:13:33+5:30
Raj Thackeray Press Conference: त्या मंत्र्यांकडून असं काही तरी कृत्य घडतायेत, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे.
मुंबई – राज्यात गाजत असलेल्या अनिल देशमुख प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. मंत्र्यांनी जी कृत्य केली त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यापुढे आणखी मंत्र्यांनी असं काही कृत्य केलं तर त्यांचाही राजीनामा होईल, सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील तर त्यांच्या मंत्र्यांनीही असं काही काम केलंय म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितले आहे.
याबाबत राज ठाकरे म्हणाले की, त्या मंत्र्यांकडून असं काही तरी कृत्य घडतायेत, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. सरकार पाडणं इतकं सोप्प आहे का? ती इमारत नाही. खालून पिलर काढले म्हणजे पडेल. परमबीर सिंग यांना १०० कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर का झाला? त्यांना काढलं नसतं तर हे समोर आलं नसतं. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे. पोलीस बदल्यांचा बाजार होतोय हे काही नवीन नाही असं त्यांनी सांगितले.
कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
त्याचसोबत अनिल देशमुख यांचा राजीनामा हा महत्त्वाचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी झालीय का? पोलिसांनी जी गाडी ठेवली ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? कोणीतरी आदेश दिल्याशिवाय पोलीस हे कृत्य करणार नाही? जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी? याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय? की त्यांच्यावर राज्य आलंय कळत नाही असा टोलाही राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
कोरोनाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या सूचना
- छोटे उद्योजक, व्यापारी यांना उत्पादन करण्यास सांगितलं आणि विक्रीवर बंदी आणली, मग त्यासाठी आठवड्यातून किमान २-३ दिवस छोटे व्यापारी, दुकानं उघडी ठेवली पाहिजे.
- लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहे, लोकांकडे पैसे नाही. त्यात बँका कर्जासाठी दबाव टाकत आहे. अनेक ठिकाणी सक्तीनं लोकांकडून पैसे वसूल केले जात आहे. त्याबाबत बँकांना सूचना द्यावी
- सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे, व्यावसायिकांना ५० टक्के जीएसटी करात सवलत द्यावी यासाठी केंद्र सरकारशी बोलावं, लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. सतत लॉकडाऊन लावणं योग्य होणार नाही.
- कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळात घेतलं. पण कोरोना लाट ओसरली त्यानंतर त्यांना कामावरून काढून घेतलं. या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं पण त्यांना काढू नये.
- क्रिडा, मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार, खेळाडू यांच्यासाठी सवलत असणं गरजेचे आहे. सराव करण्यासाठी परवानगी द्यावी. सरकारच्या तिजोरीची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्यांना हमीभावासाठी पैसे द्यावेत
- शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होतेय? शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे. १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकललं पाहिजे. लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. १० वी, १२ वी परीक्षा न घेता त्यांना पास करावं. विद्यार्थ्यांचा विचार करताय तसा शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा अशा विविध मागण्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) केल्या आहेत