“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:47 PM2021-08-10T13:47:00+5:302021-08-10T13:50:37+5:30

स्थानिक परिसराच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आमदार निधी. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?, मनसेचा सवाल.

mns sandeep deshpande slams shivsena over cm uddhav thackeray mla fund shivaji park mumbai | “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण 

“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण 

Next
ठळक मुद्देस्थानिक परिसराच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आमदार निधी.चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?, मनसेचा सवाल.

आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. २२ एकरात पसरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे. त्यामध्ये विद्युत दिवे, पथदिवे, रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.

 “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प चोरला आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे.

 
मनसेवर कुरघोडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनेचा दादर आणि शिवाजी पार्क परिसरातील प्रभाव थोडा कमी झाला होता. याठिकाणी २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे सर्व नगरसेवक निवडून आले होते. दादर येथील शिवसेनेचा पराभव खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्याही जिव्हारी लागला होता. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने इथं पुन्हा कमबॅक केले. परंतु दादर आणि शिवाजी पार्क परिसरात मनसेचेही वर्चस्व कायम आहे. स्थानिक आमदार, नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील शुशोभिकरणाच्या निमित्तानं शिवसेनेने या भागात त्यांचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: mns sandeep deshpande slams shivsena over cm uddhav thackeray mla fund shivaji park mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.