"बहिरं सरकार ऐकेल का?"; 'तो' Video शेअर करत मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:39 PM2021-06-27T20:39:30+5:302021-06-27T20:42:47+5:30
MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government : मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.
मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,02,33,183 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,040 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,258 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,95,751 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी सध्या लोकल सेवा ही बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.
लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल एका तरुणाने रेल्वेच्या खंत व्यक्त केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ ट्वीट करत मनसेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बहिरं सरकार ऐकेल का???" असं म्हणत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱी वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र असं असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला.
बहिर सरकार ऐकेल का??? pic.twitter.com/BJx1zA545e
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 27, 2021
परेल स्थानकावर टीसीने तरुणाला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. "आज नोकरीचा दुसराच दिवस आहे. परेल स्थानकावर आल्यानंतर टीसीने मला पकडलं. एक दीड वर्षांपासून घरी होतो. आता नोकरी मिळाली आहे. यात टीसीची काहीच चूक नाही. ते त्यांचं काम करत आहेत. पण सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसं रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर चारशे रुपये आहेत."
"खूप मेहनतीनंतर नोकरी मिळाली आहे. तिकीट मिळत नाहीत, पासही मिळत नाहीत. पण सरकारी नोकरदार नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमच्याकडे आज पैसे नाहीत आणि तरीही आमच्याकडून दंड वसूल केला जात असेल. सरकार अशी लुबाडणूक करत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं? लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. लोक फिरत आहेत मग का कोविड कोविड करत बसायचं?, लोकं जगणार कशी?" असं तरुणाने आपल्या व्हि़डीओत म्हटलं आहे." तरुणाचा हा व्हिडीओ शेअर करत मनसेने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
"डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ?, दुपारी 4 वाजताच शहराला टाळं लागणार"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल#MaharashtraGovernment#BJP#atulbhatkhalkar#UddhavThackeray#ThackerayGovernment#Politics@BhatkhalkarAhttps://t.co/caUTkNmEKjpic.twitter.com/f4eUTV7hET
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021