अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 02:28 PM2021-04-11T14:28:33+5:302021-04-11T14:32:09+5:30

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते.

MNS supports NCP in Pandharpur by-election; Leaders landed in the campaign | अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात

अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात

googlenewsNext
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याही घरी भेट दिली होती.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.

पंढरपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानीही अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसेनेराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.(MNS Support NCP Candidate in Pandharpur Assembly Bypoll Election)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ पाठिंबा नाही तर मनसेचे स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारदेखील करत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झालं आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती. याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.

परिचारकांच्या नेत्यांच्या घरी भेट दिल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याही घरी भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी धोत्रेंच्या कार्यकर्त्यांची देखील विचारपूस केली. शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी गरज भासल्यास सांगा, प्रश्न मार्गी लावू असे पवारांनी धोत्रेंना सांगितले. मात्र,या भेटीमागचा उद्देश फक्त भगिरथ भालकेंना मदत व्हावी, एवढाच असल्याचे दिसून आले.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे  हे २१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

Web Title: MNS supports NCP in Pandharpur by-election; Leaders landed in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.