Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक; उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:38 AM2021-07-06T08:38:01+5:302021-07-06T08:38:53+5:30

Modi Cabinet expansion tomorrow: दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. तसेच मंत्र्यांनी काय कामे केली याचाही त्यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला होता. २० जूनला त्यांनी या नेत्यांची बैठक घेतली होती. यामध्ये २ वर्षांत काय कामे केली याची समीक्षा केली होती.

Modi Cabinet expansion expected this week, 7 july, PM Narendra Modi's big meeting likely today | Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक; उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार शक्य

Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक; उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार शक्य

googlenewsNext

केंद्रीय मंत्रीमंडळात उद्या किंवा या आठवड्यात मोठे फेरबदल (Cabinet reshuffle) केले जाणार आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत. (Cabinet reshuffle expected this week, PM Modi's crucial meeting likely today)

तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित

दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. तसेच मंत्र्यांनी काय कामे केली याचाही त्यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला होता. २० जूनला त्यांनी या नेत्यांची बैठक घेतली होती. यामध्ये २ वर्षांत काय कामे केली याची समीक्षा केली होती.

मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार याच आठवड्यात किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. हा विस्तार ७ किंवा ८ जुलैला होईल. चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांना हटविले जाणार आहे. तर नव्या दमाचे जवळपास २२ नेत्यांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. 
याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार-२ ला दोन वर्षे होऊन गेली आहेत. यामुळे आगामी पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समाजाचे नेते, राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे. 

नारायण राणे दिल्लीत...
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीनं दिली आहे. त्यामुळे राणे उद्याच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

Web Title: Modi Cabinet expansion expected this week, 7 july, PM Narendra Modi's big meeting likely today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.