'नवा कुर्ता-पायजमा सांभाळून ठेवा', मोदींच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या सुशील मोदींवर तेज प्रताप यांची सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:43 PM2021-07-07T21:43:24+5:302021-07-07T21:44:33+5:30
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचंही नाव चर्चेत होतं. पण त्यांना संधी देण्यात आलेली नाही. याच मुद्द्यावरुन 'राजद'चे नेते तेज प्रताप यादव यांनी सुशील मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला. यात २८ राज्यमंत्री आणि १५ कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपद व गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधीआधी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्यासाठी अनेक नेत्यांची नावं आघाडीवर होती. अनेकांची जोरदार चर्चा देखील होती. यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचंही नाव चर्चेत होतं. पण त्यांना संधी देण्यात आलेली नाही. याच मुद्द्यावरुन 'राजद'चे नेते तेज प्रताप यादव यांनी सुशील मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
"आजच्या शपथविधीसाठी जो कुर्ता-पायजमा तुम्ही शिवून घेतला होता. तो आता सांभाळून ठेवा. तेजस्वी यादव लवकरच शपथ घेणार आहेत आणि त्या सोहळ्यासाठी प्रेक्षकगृहात तुमच्यासाठी एक खुर्जी राखीव ठेवली आहे", असं ट्विट तेजप्रताप यादव यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडल में शामिल होने वाले सभी नए मंत्रियों को शुभकामनाएं। सुशील मोदी जी के लिए ढेर सारी सांत्वनाएं। छोटका मोदीजी, नया कुर्ता - पायजामा जो सिलवाएं हैं उसको संभालकर रखिए जल्द तेजस्वी का शपथग्रहण होने वाला है वहाँ दर्शकदीर्घा में एक कुर्सी आपके लिए रिजर्व रखा जाएगा।
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) July 7, 2021
मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व नेत्यांचं तेजप्रताप यादव यांनी अभिनंदन देखील केलं आहे. तर सुशील मोदी यांचं सात्वन केलं आहे. "केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन आणि सुशील मोदी यांचं मनापासून सात्वन. सुशील मोदींनी नवा कुर्ता आणि पायजमा सांभाळून ठेवावा. लवकरच तेजस्वी यादव राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यासाठी प्रेक्षकगृहात एक खुर्ची तुमच्यासाठी राखीव ठेवली आहे", असं तेजप्रताप यादव यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.