हिंदी पट्ट्यात मोदी लाटेने निनादली विजयाची दुदुंभी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:48 AM2019-05-26T03:48:09+5:302019-05-26T06:56:23+5:30
सलग दुसऱ्यांदा सत्तेचा सोपान सर करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्ये भाजपसाठी महत्त्वाची ठरली आहेत.
नवी दिल्लीः सलग दुसऱ्यांदा सत्तेचा सोपान सर करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्ये भाजपसाठी महत्त्वाची ठरली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप आणि मित्रपक्ष मोदींच्या त्सुनामीरूपी लाटेवर स्वार होत तब्बल ९० टक्के विजयी दराने दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत.
मोदी लाटेच्या बळावर भाजप आणि मित्रपक्षांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधील २२५ जागांपैकी २०३ जागा पटकावल्या. २०१४ च्या निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यातील १० राज्यांत भाजपच्या यशस्वीतेचा दर ८५ टक्के होता. या १० राज्यांतील २२५ पैकी १९० जागा भाजपने जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्रपक्षांच्या पारड्यात ६२ जागा आल्या आहेत. भाजप प्रणीत राष्टÑीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३९ जागा जिंकल्या आहेत. भाजपला ११ जागा. एक जागा भाजपच्या मित्रपक्षाने जिंकली.