मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:57 AM2019-05-09T08:57:55+5:302019-05-09T08:59:30+5:30

नर्सरीतल्या पोएमचं विडंबन करत मोदींवर निशाणा

Modi Modi Yes Papa Tejashwi Yadavs RJD Takes a jibe at PM modi With Iconic Nursery Rhyme | मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार

मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार

googlenewsNext

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कवितेतून निशाणा साधला आहे. 'जॉनी जॉनी येस पापा' कवितेचं विडंबन करत राजदनं विकास, रोजगार, काळा पैसा, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातल्या समस्यांशी मोदींना काही देणंघेणं नसून केवळ जुमलेबाजी सुरू असल्याचा टोला कवितेतून लगावण्यात आला आहे. 

'भविष्यात मोदी भक्तांची मुलं ही कविता म्हणतील. मोदी मोदी येस पापा.. अ‍ॅनी डेव्हलपमेंट? नो पापा.. फार्मर हॅप्पी? नो पापा... वूमन सेफ? नो पापा... 10 करोड जॉब? नो पापा... 15 लाख? नो पापा... ओन्ली जुमला? हा हा हा...,' असं ट्विट राजदनं केलं आहे. राजदकडून याआधीही अनेकदा मोदी, भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांवर निशाणा साधण्यात आला आहे. 




राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच देशात राजकीय भूकंप होईल, असं विधान सोमवारी केलं होतं. '23 मे रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. भाजपा आणि संयुक्त जनता दलात मतभेद होत असल्याचं कारण त्यावेळी त्यांच्याकडून देण्यात येईल,' असं भाकीत यादव यांनी वर्तवलं आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून सातही टप्प्यात मतदान आहे. 

Web Title: Modi Modi Yes Papa Tejashwi Yadavs RJD Takes a jibe at PM modi With Iconic Nursery Rhyme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.