मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:14 AM2019-04-25T05:14:17+5:302019-04-25T05:15:11+5:30

वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Modi's state is the next state of emergency - Raj Thackeray | मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

googlenewsNext

मुंबई : पुलवामा हल्ल्याशी संबंधित किंवा गेल्या पाच वर्षांत आणलेल्या योजनांसंदर्भात नेमक्या बातम्या, आकडेवारी जनतेसमोर येऊ द्यायची नाही. अशा घटना आणि योजनांच्या माध्यमातून स्वत:ला पोषक वातावरण निर्माण करायचे, असा धंदा भाजपने सुरू केला आहे. ही आणीबाणीच्या पुढची परिस्थिती आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
भांडुप येथे बुधवारी मनसेची सभा झाली. या वेळी त्यांनी मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांना खोटे बोलण्याचा रोग जडलाय, अशी बोचरी टीकाही केली. नोटाबंदी, जीएसटी ही फसलेली धोरणे आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

साध्वी प्रज्ञा सिंह हिला तिकिट देऊन भाजपवाले तिच्या कृत्याचे समर्थनच करीत आहेत. त्या बाईला सिग्नल तोडला म्हणून अटक केली नव्हती, तर ती बॉम्बस्फोटाची केस होती. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. मरणारी माणसे कोणत्या धर्माची आहेत, हे बॉम्बला माहीत नसते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाठीशी घालू नका, असेही राज म्हणाले.

मोनिका मोरेही स्टेजवर
रेल्वे अपघातात दोन्ही हात गामवलेल्या मोनिका मोरे हिला देखील स्टेजवर आणण्यात आले. तिला कुठलीही राजकीय मदत न करता केवळ जाहिरात करण्यात आल्याचे सांगत राज यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निषाणा साधला. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे, अशी बोंब इथले खासदार किरीट सौमय्या यांनी २०१४ पूर्वी ठोकली होती. २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यावर सौमय्या गप्प का? असा सवाल राज यांनी सभेतून उपस्थित केला.

‘पंतप्रधानांच्या गावी शौचालयच नाही’
मोदी यांच्या विविध योजनांचा व्हिडिओतून पोलखोल करत राज यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांसह त्यांच्या स्वत:च्या गावाची दुर्दशा दाखवली. मोदींच्याच गावात महिलांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्या गावात शौचालयेच नाहीत. हा माणूस जिथून आला त्या गावाची परिस्थिती अशी असेल, तर तो देश का बदलेल? अशी टीकाही त्यांनी केली.

 

Web Title: Modi's state is the next state of emergency - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.