''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:06 AM2019-04-14T00:06:17+5:302019-04-14T00:07:31+5:30

संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

"Moini MP in Anant Geete Parliament" | ''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

Next

गुहागर : गेली अनेक वर्षे मी केंद्रात काम करतोय. सहा टर्म अनंत गीतेंना केंद्रात पाहतोय. एखादा जागरूक प्रतिनिधी केंद्रात असेल मग तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्याला सहकार्य करणे माझे काम समजतो. अनंत गीते यांनी खासदार म्हणून कधीही तोंड उघडले नाही. लोकांचे प्रश्न, दु:ख कधी मांडलेले मला आठवत नाही. संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ शृंगारतळी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले की, सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद सदस्यापासून अर्थमंत्रीपर्यंत प्रदीर्घ काळ ग्रामीण पातळीपासून देशपातळीवर काम केले आहे. कोकणाचे नेतृत्व करणारा चांगला माणूस तटकरेंच्या रूपाने मिळाला आहे. ती कुवत तटकरेंमध्ये असल्याने त्यांची उमेदवारी महत्त्वाची आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल केवळ ७ महिने उद्योगमंत्री असताना काही हजार कोटींचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आणला त्याचे कामही सुरू झाले. मात्र, सरकार बदलल्यानंतर अनंत गीते यांनी मंत्री म्हणून पुढील काम होऊ दिले नाही. याउलट सुनील तटकरे यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा पदाचा जनतेसाठी उपयोग करून आपला वेगळा ठसा उमटवला.


सुनील तटकरेंना जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्या सर्व पदांवर काम करताना त्यांनी कर्तृत्वाचा दाखला दिला आहे. कोकणाशी बांधिलकी असणारा हा नेता आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते नंतर कोकणच्या नेतृत्वाची पोकळी सुनील तटकरे यांच्या रूपाने भरून निघेल, असे पवार म्हणाले.
या वेळी सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, बाबाजी जाधव, संजय कदम, नवीनचंद्र बांदिवडेकर, चित्रा वाघ, रामचंद्र हुमणे, विक्रांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे कुमार शेटे, शेखर निकम, विनायक मुळे, सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यही या वेळी उपस्थित होते.

>पावसाचे सावट; भाषण थोडक्यातच आटोपले
सभा सुरू होण्यापूर्वीच ढगाळ वातावरण व वारा सुटला होता. शरद पवार यांचे भाषण सुरू होण्याआधीच पावसाचा जोर वाढल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पांगापांग सुरू झाली होती. अशा परिस्थितीत समयसूचकता लक्षात घेऊन शेवटी शरद पवार यांनी थोडक्यातच आपले भाषण आटोपते घेतले.
>तटकरे हे कोकणशी बांधिलकी असलेले नेतृत्व.
कोकणच्या नेतृत्वाची पोकळी सुनील तटकरे यांच्या रूपाने भरून निघेल : शरद पवार.

Web Title: "Moini MP in Anant Geete Parliament"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.