निवडणूक रिंगणात पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्षच अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:27 AM2019-03-22T05:27:48+5:302019-03-22T05:29:06+5:30

कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष.

More in comparison to party candidates in election fringe | निवडणूक रिंगणात पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्षच अधिक

निवडणूक रिंगणात पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्षच अधिक

Next

नवी दिल्ली - कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष... अशी स्थिती निवडणूक जवळ आली की पाहायला मिळते. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडील उपलब्ध माहितीनुसार आकड्यांचेच गणित मांडायचे झाल्यास लोकसभा निवडणुकीत १९९८ पासून एकूण उमेदवारांपैकी चक्क निम्मे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते.
पाहायला गेल्यास निवडणूक लढविणे बरेच खर्चीक असते; शिवाय अनोळखी पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला आपला नेता म्हणून निवडून देण्यात अनेकदा मतदारांना स्वारस्य नसते. हे माहीत असूनही अशा प्रकारे अपक्ष किंवा वेगळा पक्ष काढून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा आकडा वाढतच आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडील आकडेवारीनुसार, १९९८ मध्ये एका लोकसभा मतदारसंघातील सरासरी उमेदवार ८.७ एवढे होते. ते २०१४ मध्ये १५.२ एवढे वाढले. या वर्षांमध्ये एका मतदारसंघातील सर्वाधिक उमेदवार अनुक्रमे ३४ आणि ४२ एवढे होते. १९९८ पासून दरवर्षी या उमेदवारांमध्ये वाढच होत आहे.
उभ्या राहणाऱ्या उमेदवारांपैकी अनेकांसाठी निवडणूक लढविणे म्हणजे स्थानिक लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग असतो. आपण जिंकणार नाही, याची जाणीव त्यांना असते. पण स्वत:चा अधिकाधिक प्रचार करणे किंवा काहीही करून मिळेल त्या मार्गाने आपला प्रभाव पाडणे हेच त्यांचे ध्येय असते. काही प्रकरणांमध्ये पुढे याच उमेदवारांनी मोठ्या पक्षांसोबत हातमिळवणी केलेली पाहायला मिळते. मतांची खेळी करणे किंबहुना मते फोडण्यासाठीदेखील या उमेदवारांचा वापर होतो, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अनेकदा तिकीट नाकारले गेल्यामुळेदेखील बंडखोरी होते. या प्रकरणी कर्नाटकचे उदाहरण बोलके ठरेल. लोकप्रिय कन्नड अभिनेते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अंबरीश यांच्या पत्नी सुमलता यांनी काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. मंड्या मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आता तिथे त्यांची लढत थेट मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्याशी असेल.
प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सुमलता इच्छुक होत्या. परंतु वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोडला. त्यामुळे संतापलेल्या सुमलता यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांचे दिवंगत पती अंबरीश चित्रपट अभिनेते होते. त्यांचीही रूपेरी पडद्यावरील प्रतिमा बंडखोर नायक अशीच होती. आता त्यांच्या पत्नीने बंडाची ‘परंपरा’ कायम ठेवली आहे. काही पक्ष तर निवडणुकीच्या तोंडावर उदयाला आलेले पाहायला मिळतात. तर काही मतांचे विभाजन करण्यासाठी बड्या पक्षांनी जन्माला घातलेले असतात. (वृत्तसंस्था)

...म्हणूनच वाढते संख्या
तिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते.

...म्हणूनच वाढते संख्या
तिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते.

निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या पक्षांची संख्या २०१४ मध्ये १,७०९ एवढी होती ती १० मार्च २०१९ पर्यंत २,३५४ एवढी वाढली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे केवळ तीन ते चार उमेदवारच प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असल्याचे मतही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Web Title: More in comparison to party candidates in election fringe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.