शिवसेना-भाजपा यांच्यात सरकार बनवण्यासाठी हालचाल; देवेंद्र फडणवीसांवरून मोठा पेच?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:28 PM2021-07-05T16:28:41+5:302021-07-05T16:37:52+5:30

भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो असा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे.

Movements between Shiv Sena and BJP to form a government; Discussion on role of Devendra Fadnavis? | शिवसेना-भाजपा यांच्यात सरकार बनवण्यासाठी हालचाल; देवेंद्र फडणवीसांवरून मोठा पेच?

शिवसेना-भाजपा यांच्यात सरकार बनवण्यासाठी हालचाल; देवेंद्र फडणवीसांवरून मोठा पेच?

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चाशिवसेना-भाजपाचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. परंतु मैत्री कायम आहे - संजय राऊतसध्या शिवसेनेचं प्राधान्य आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांवर आहे.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा कॅबिनेट विस्तार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवू शकतो. भाजपा आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पडद्यामागून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याने केंद्रीय कॅबिनेट विस्तार लांबला असल्याचं सांगितले जात आहे. कॅबिनेट विस्तार कधीही होऊ शकतो. सध्या दोन्ही पक्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार देवेंद्र फडणवीस यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान देऊन दिल्लीला बोलावलं जाऊ शकतं. त्यानंतर भाजपा-शिवसेना एकत्र येत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि भाजपाचे २ उपमुख्यमंत्री बनवतील असं सांगण्यात आलं आहे.

परंतु केंद्रीय कॅबिनेट विस्ताराचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही. पक्ष नेतृत्वाबाबत तडजोडीला तयार नाही. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत असं भाजपातील काही सूत्रांचे म्हणणं आहे. NDTV नं याबाबत रिपोर्ट दिला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते महाराष्ट्रातच राहतील. भाजपात कोणता निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान ठरवतात. ते जे काही ठरवतील ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं. पक्षाने मला विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली आहे. ती मी निभावत आहे. मला दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. पक्ष याबाबत निर्णय घेईल असं फडणवीसांनी सांगितले आहे.

परंतु भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना शिवसेना-भाजपाने एकत्र यावं असं वाटतं. शिवसेना-भाजपा यांची युती होऊ शकते. अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्ष वेगळे  झाले. ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही भारत-पाकिस्तानसारखे नाही, आमचं नातं आमिर खान आणि किरण रावसारखं आहे. म्हणजे शिवसेना-भाजपाचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. परंतु मैत्री कायम आहे. त्याचसोबत शिवसेनेतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर पुन्हा भाजपाच्या नेतृत्वावर भरवसा ठेऊ शकतो का? सध्या शिवसेनेचं प्राधान्य आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांवर आहे. पुढील वर्षी राज्यात १० महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जर शिवसेना-भाजपात युती झाली नाही तर दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

Web Title: Movements between Shiv Sena and BJP to form a government; Discussion on role of Devendra Fadnavis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.