...नाहीतर तुमच्यावर अॅसिड टाकून जीवे मारु, नवनीत राणा यांना धमकी; राजकारणात खळबळ
By मुकेश चव्हाण | Updated: February 16, 2021 19:21 IST2021-02-16T19:19:15+5:302021-02-16T19:21:51+5:30
नवनीत राणा यांनी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

...नाहीतर तुमच्यावर अॅसिड टाकून जीवे मारु, नवनीत राणा यांना धमकी; राजकारणात खळबळ
नवी दिल्ली/ मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी देणारं पत्र काही १३ फेब्रुवारीला आलं होतं. याप्रकरणी नवनीत राणा यांनी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
८ दिवसांत माफी मागा नाहीतर तुमच्यावर अॅसिड टाकून जीवे मारू, अशा आशयाचं एक पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील घरी आलं होतं. तसेच शिवसेनेच्या लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. परंतु या पत्रानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आणि त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
खासदार नवनीत राणा यांना अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021