शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 09:55 AM2021-01-15T09:55:22+5:302021-01-15T09:55:48+5:30

West Bengal politics: राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MP Shatabdi Roy will make decision on tomorrow at 2 pm; Mamata in tension | शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये

शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये

Next

कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणूक जससशी जवळ येऊ लागली आहे तसतसे तेथील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. यामुळे तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणींत वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. 


फेसबुक पोस्टवर व्यक्त होत रॉय यांनी पक्षातील काही नेते त्यांना कमी लेखू लागले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय भविष्यावर त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून यासाठी त्यांनी शनिवारी, 16 जानेवारी दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. 
शताब्दी यांनी म्हटले की, लोक त्यांना विचारतात की पक्षाच्या बीरभूममधील कार्यक्रमांना का येत नाही. मी कशी सहभागी होऊ, जर मला त्यांचे शेड्यूलच माहिती होत नाही. मला वाटते काही लोकांना मी तिथे असावे असे वाटत नाही. 


टीएमसीच्या सुत्रांनुसान 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शताब्दी रॉय फार कमी कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. लोकांनी त्यांना शेवटचे 28 डिसेंबरला पाहिले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूमच्या रॅलीमध्ये त्या आल्या होत्या. ममता यांनी या रॅलीमध्ये त्यांना महत्व दिले होते. तसेच रॅलीमध्ये त्यांचे नावही घेतले होते. 


स्थानिक नेते का नाराज?
शताब्दी रॉय यांनी खासदार निधी लोकांमध्ये विकासकामांसाठी परस्पर वाटला होता. यामुळे स्थानिक नेते नाराज होते. शताब्दी यांनी असे करताना स्थानिक नेत्यांचे मत घेतले नाही. यामुळे त्यांना बाजुला ठेवण्यास सुरुवात झाली आहे. 


2009 पासून खासदार
शताब्दी रॉय या 2009 पासून टीएमसीच्या खासदार आहेत. बीरभूममधून त्यांनी निवडणूक लढविली होती. यानंतर त्या 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविली होती. बंगाली फिल्मसिटीच्या त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 

Web Title: MP Shatabdi Roy will make decision on tomorrow at 2 pm; Mamata in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.