MPSC Exam Postponed: “महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणार नाही, मग MPSC परीक्षा का थांबवल्या?”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:35 PM2021-03-11T18:35:33+5:302021-03-11T18:41:15+5:30

BJP Pravin Darekar Target Thackeray government over MPSC Exam Postponed Decision: सरकारचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नाही, अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षांची तयारी करत होते, अशातच ३ दिवस शिल्लक असताना सरकारने अचानक परीक्षा रद्द केल्या,

MPSC Exam Postponed: "Maharashtra has not stopped then why MPSC exam was stopped?" Pravin Darekar | MPSC Exam Postponed: “महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणार नाही, मग MPSC परीक्षा का थांबवल्या?”

MPSC Exam Postponed: “महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणार नाही, मग MPSC परीक्षा का थांबवल्या?”

Next
ठळक मुद्देसरकार अशाप्रकारे निर्णय घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतंयMPSC परीक्षांसाठी सरकारने काहीच नियोजन केले नाही, फक्त कोरोनाचं नाव पुढे घेऊन परीक्षा रद्द केल्याकोरोनाची काळजी घेऊन अधिवेशन पार पाडलं, मग MPSC परीक्षा का होऊ शकत नाही?

मुंबई – राज्यात १४ मार्च रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मात्र या निर्णयाच्या विरोधात राज्यभरात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, अशातच विरोधी पक्ष भाजपानेही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही असं सरकार म्हणतं मग MPSC परीक्षा का थांबवल्या? असा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी सरकारला लगावला आहे. (BJP Pravin Darekar Reaction on Thackeray Government decision of MPSC Exam Postponed)

याबाबत प्रविण दरेकर म्हणाले की, कोरोना काळात कोणतंही काम करताना नियोजन करावं लागतं, पण MPSC परीक्षांसाठी सरकारने काहीच नियोजन केले नाही, फक्त कोरोनाचं नाव पुढे घेऊन परीक्षा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम सरकार करतंय असा आरोप त्यांनी केला.

 MPSC विद्यार्थ्यांच्या अघोषित आंदोलनात कसे पोहचले गोपीचंद पडळकर? जाणून घ्या घटनाक्रम

तसेच सरकारचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नाही, अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षांची तयारी करत होते, अशातच ३ दिवस शिल्लक असताना सरकारने अचानक परीक्षा रद्द केल्या, सरकार अशाप्रकारे निर्णय घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतंय, वाद निर्माण करून सत्ता कशी सुरक्षित राहील यात सरकार रमलं आहे. कोरोनाची काळजी घेऊन अधिवेशन पार पाडलं, मग MPSC परीक्षा का होऊ शकत नाही? असा प्रश्नही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

“अधिवेशन, लग्न समारंभ होतात मग MPSC परीक्षा का नाही?”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

काँग्रेस नेत्यांचाही सरकारच्या निर्णयाला विरोध

MPSCची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत असून त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक अडचण होणार आहे. तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल. तसेच वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत आहे. इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी सरकारला विचारला आहे.

पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

Web Title: MPSC Exam Postponed: "Maharashtra has not stopped then why MPSC exam was stopped?" Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.