अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:30 PM2021-03-16T15:30:22+5:302021-03-16T15:31:59+5:30

mukesh ambani security scare: भाजपच्या रडारवर शिवसेना; वाझेंचा बचाव कशासाठी केला जातोय? राम कदमांचा सवाल

mukesh ambani security scare bjp mla ram kadam slam thackeray government | अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा (mukesh ambani security scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. यावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष सुरू झाला आहे. भाजपनं या प्रकरणात शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र एनआयएनं त्यांना अटक केली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंची पाठराखण केली होती. आता वाझेंच्या अटकेनंतर भाजपनं शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.



भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. 'अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत? वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का?', असे प्रश्न कदम यांनी विचारले आहेत.

'महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करतंय का? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का? या दृष्टीनं तपास व्हावा अशी आमची मागणी आहे,' असं राम कदम यांनी म्हटलं. 'कोट्यवधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं कारण काय? एक साधारण एपीआय दर्जाचा अधिकारी इतकं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का?' असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: mukesh ambani security scare bjp mla ram kadam slam thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.