Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:46 PM2021-05-26T18:46:11+5:302021-05-26T19:04:49+5:30

Muktainagar 10 BJP corporators joined Shivsena in the presence of cm Uddhav Thackeray जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका देत भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतलं आहे.

muktainagar 10 bjp corporators joined shivsena in the presence of cm uddhav thackeray | Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

googlenewsNext

जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्यामुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका देत भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या १० आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. Muktainagar 10 BJP corporators joined Shivsena in the presence of cm Uddhav Thackeray

राज्याचे कॅबिनेटमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. 

मुक्ताईनगरमधून याआधी एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा धक्का दिला होता. माजी विरोधी पक्षनेते राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला होता. खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत आले होते. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याचं काम सुरू ठेवलं आहे. 

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतंही याचं उदाहरण पाहायला मिळालं होतं. एकनाथ खडसे यांनी आपली शक्ती पणाला लावून भाजपच्या धक्का देत महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौरपदी विराजमान झाल्या होत्या आणि भाजपचा बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली होती.

Web Title: muktainagar 10 bjp corporators joined shivsena in the presence of cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.