कंगनाला भेटायला वेळ असतो; पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही; पवारांचा राज्यपालांना टोला
By कुणाल गवाणकर | Published: January 25, 2021 04:09 PM2021-01-25T16:09:58+5:302021-01-25T16:13:45+5:30
Mumbai Farmers Protest: शेतकरी आंदोलनाला संबोधित करताना शरद पवारांकडून राज्यपाल कोश्यारींची समाचार
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद मैदानात संबोधित केलं. शेतकरी राज्यपालांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मुंबईत आले असताना राज्यपाल मात्र गोव्याला गेले. यावरून पवार यांनी राज्यपालांना टोला हाणला.
आंदोलक शेतकऱ्यांची मोदींनी विचारपूस केली का? ते काय पाकिस्तानचे आहेत का?- शरद पवार
राज्याला इतिहासात पहिल्यांदाच असे राज्यपाल लाभले आहेत. हजारो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढून मुंबईत दाखल झाले. या शेतकऱ्यांना राज्यपालांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे. पण आमचे राज्यपाल गोव्याला गेले आहे. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. राज्यपालांनी मोर्चाला सामोरं जायला हवं होतं. राजभवनात बसायला हवं होतं. ते घटनात्मक पदावर आहेत. पण आता काय बोलणार, असं पवार पुढे म्हणाले.
You are going to Raj Bhavan to meet the Governor. Maharashtra has never seen such a Governor before. He has the time to meet Kangana (Ranaut) but not the farmers. It was the moral responsibility of the Governor to come here & meet you: NCP chief Sharad Pawar https://t.co/aqZw7F7HNz
— ANI (@ANI) January 25, 2021
"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका
चर्चा न करता कायद्यांना मंजुरी
केंद्र सरकारनं कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे आणले. एका अधिवेशनात एकाच दिवसात तीन कायदे मांडले गेले आणि ते लगेच मंजूर करून घेण्यात आले. त्याला राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि इतरांनी विरोध केला. चर्चेची मागणी केली. पण कोणत्याही चर्चेशिवाय कायद्यांना मंजुरी देण्यात आली, असं पवार यांनी म्हटलं.
Braving cold weather, farmers from Punjab, Haryana & Uttar Pradesh are agitating for the last 60 days. Has the PM enquired about them? Do these farmers belong to Pakistan?: NCP chief Sharad Pawar addressing farmers' rally in Mumbai in support of farmers protesting in Delhi pic.twitter.com/cgRp7QruXJ
— ANI (@ANI) January 25, 2021
गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा : अबू आझमी
कायद्यांवर चर्चा होते आणि मग ते मंजूर होतात, अशी पद्धत संसदीय लोकशाहीत आहे. पण तीन कृषी कायदे मंजूर करताना कोणतीही चर्चा केली नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. आज त्यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्याही चर्चेविना कायदे केले. पण जनता तुम्हाला आणि तुमच्या कायद्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.
पंजाब पाकिस्तानात येतं का?; पवारांचा सवाल
कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांची पंतप्रधान मोदींनी साधी चौकशी तरी केली का, असा प्रश्न पवारांनी विचारला. आंदोलक शेतकरी पंजाबचे असल्याचं म्हणतात. पंजाब काय पाकिस्तानात येतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला स्वयंपूर्ण करण्यात पंजाबचं योगदान मोठं आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात पंजाबनं मोठी किंमत मोजली आहे. जालियनवाला बागेत रक्त सांडलं आहे. फाळणीवेळी पंजाबनं सर्वाधिक घाव सोसले आहेत, याची आठवण पवारांनी करून दिली.