‘लाव रे तो व्हिडीओ’ ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:57 AM2019-04-22T05:57:32+5:302019-04-22T05:58:14+5:30

राज ठाकरे यांच्या काळाचौकी येथील सभेस अखेर परवानगी

Mumbaikar keen to listen to 'Love Ray!' | ‘लाव रे तो व्हिडीओ’ ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक!

‘लाव रे तो व्हिडीओ’ ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक!

Next

मुंबई : राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेस अखेर परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी २३ तारखेला काळाचौकी येथे राज यांची सभा होणार असून, ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत ते कोणता व्हिडीओ दाखवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेसाठी मनसेने महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. मात्र, पालिकेने या सभेची परवानगी नाकारली होती. यावरून राजकीय वादंग निर्माण झाल्यानंतर राज यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. येत्या २३ एप्रिल रोजी काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात राज यांची सभा होणार आहे.

सभा एक दिवस आधी
मनसेने २४ एप्रिलला सभेसाठी परवानगी मागितली होती. मात्र, एक दिवस आधी २३ एप्रिलला सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली ‘एक खिडकी यंत्रणा’ आणि पालिकेकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून याआधी करण्यात आला होता.

दुजाभाव नाही - निवडणूक आयोग
निवडणूकविषयक सर्व प्रकारच्या सभा, प्रचारसभांसाठीच्या रीतसर परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘एक खिडकी योजनें’तर्गत दिल्या जातात. त्यामध्ये सर्वच पक्ष, अपक्षांचा समावेश असतो. नियमानुसार या परवानग्या दिल्या जातात. त्यात कोठेही पक्षपातीपणा केला जात नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील सभेची परवानगी मागितली होती. त्यांनाही आज नियमाप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. तसेच अन्य पक्षांचेही अर्ज आले असून, त्यांचाही नियमानुसार विचार केला जात आहे. याबाबत होत असलेल्या अपप्रचाराबाबत खुलासा करण्यात येत आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Mumbaikar keen to listen to 'Love Ray!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.