घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:54 PM2021-02-17T18:54:13+5:302021-02-17T18:56:38+5:30

Ashish Shelar Warns Shivsena on Sampark Abhiyan : लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला आहे.

Mumbaikars waiting for you; bjp's MLA Ashish Shelar warns Shiv Sena | घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

Next

मुंबई : बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतींची खैरात, मग सामान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात मग पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टॅक्स वसुली करून पाकिटमारी का करताय?..असे मुंबईकरांचे बरेच हिशेब बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही घराघरात जावाच, असा टोला भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला आहे. (Ashish Shelar talks on Shivsena's Sampark Abhiyan in mumbai municipal Election.)

शिवसेनेने जाहीर केलेल्या संपर्क अभियानाबाबत बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे. कोरोनाला घाबरून "घराघरात" लपून का बसला होतात?मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होता? एकही रुपयाची मदत का दिलीत नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय? असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले आहेत.

तसेच राज्यात वाढत असलेल्या कोरोनाबाबत ते म्हणाले की, लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे, अशी टीका केली.
लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही त्यांनी केला आहे.

Web Title: Mumbaikars waiting for you; bjp's MLA Ashish Shelar warns Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.