माझा पराभव निश्चित; भाजप उमेदवाराला खात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:46 AM2019-04-17T05:46:07+5:302019-04-17T05:46:26+5:30

लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले असताना भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला पराभव निश्चित असल्याचे मुलाखतीत सांगून टाकले.

My defeat is certain; BJP sure | माझा पराभव निश्चित; भाजप उमेदवाराला खात्री

माझा पराभव निश्चित; भाजप उमेदवाराला खात्री

Next

मुरादाबाद : लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले असताना भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला पराभव निश्चित असल्याचे मुलाखतीत सांगून टाकले.
गेल्या वेळी ते येथून विजयी झाले होते. मुरादाबादमध्ये २३ मे रोजी मतदान होणार आहे. आपण यंदा निवडून येऊ , याविषयी साशंकता कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी व्यक्त केली. एका वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की, यंदा सारे मुस्लीम मतदार एकत्र आल्याने विजयी होण्याची खात्री वाटत नाही. गेल्या वेळी मोदी लाट होती. यंदा परिस्थिती उलट आहे. या मतदारसंघातून सप-बसप आघाडी व काँग्रेस यांचे उमेदवार मुस्लीम आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: My defeat is certain; BJP sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.