Narayan Rane: नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह, जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:11 PM2021-08-24T17:11:41+5:302021-08-24T17:37:44+5:30

Narayan Rane News: ठाकरे सरकारने थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून मोदी सरकारला जबर धक्का दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह झाले आहे.

Narayan Rane: After the arrest of Narayan Rane, BJP's central leadership became active, J.P. Indications that Nadda tweeted | Narayan Rane: नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह, जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत

Narayan Rane: नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह, जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत

Next

नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणेंचे हे वक्तव्य आणि त्यानंतर राज्यात पेटलेल्या शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजपा वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, हा वाद तापला असतानाच ठाकरे सरकारने थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करून मोदी सरकारला जबर धक्का दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व अ‍ॅक्टिव्ह झाले आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भात ट्वविट करत पक्षाच्या भविष्यातील धोरणाबाबत थेट संकेत दिले आहेत. (After the arrest of Narayan Rane, BJP's central leadership became active, J.P. Indications that Nadda tweeted)

नारायण राणेंवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंची केलेली केली अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे.  या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार, ना दबून राहणार. भाजपला जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मंडळी त्रस्त आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असे जे.पी. नड्डा म्हणाले. 

दरम्यान, आज दिवसभर चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पोलिसांनी नारायण राणेंना रत्नागिरीमधील संगमेश्वर येथून ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावरील अटकेची कारवाई सुरू केली होती. नारायण राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलीस दाखल झाल्यानंतर राणेंसोबत असलेले भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाली.

स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे आठवत नाही. मी जर त्या ठिकाणी असतो तर कानाखाली खेचली असती, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर नारायण राणेंविरोधात शिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.

Web Title: Narayan Rane: After the arrest of Narayan Rane, BJP's central leadership became active, J.P. Indications that Nadda tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.