खासदार शिवसेनेचे अन् काम पवारांचे; नारायण राणेंचा पवार-राऊत मुलाखतीवर प्रहार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:35 PM2020-07-16T16:35:07+5:302020-07-16T16:42:36+5:30
पिंजऱ्यात बसून राज्य चालवता येत नाही. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरं वाटेल अशी टीका नारायण राणेंनी पवारांवर केली
मुंबई – राज्यात कोरोनाची गांभीर्य परिस्थिती असताना केवळ राजकीय हेतून प्रेरित अशी संजय राऊत आणि शरद पवारांची मुलाखत होती, केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी मुलाखत होती, भाजपासोबत निवडून यायचं आणि सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बसायचं ही शिवसेनेची बेईमानी आहे अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत हे खासदार शिवसेनेचे आणि काम पवारांचे करतात. संजय राऊत शिवसेनेचे खासदार असले तरी शिवसेनेचे नाहीत हे शिवसैनिकांनाही माहिती आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारापासून लक्ष विचलित करण्यासाठी पवारांची मुलाखत घेतली. पिंजऱ्यात बसून राज्य चालवता येत नाही. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरं वाटेल अशी टीका नारायण राणेंनी पवारांवर केली
तसेच देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे, मी पुन्हा येईन या शब्दाचा अर्थ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी केले होते, त्यात घमेंड कुठून आली? २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले, महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवार, शिवसेनाप्रमुखांचे विधान अशी हेडिंग सामनाने दिली होती, आता त्यांचीच मुलाखत घेऊन शिवसेनेचे गोडवे गायले जात आहेत. सामनातून आजपर्यंत शरद पवारांवर अनेकदा टीका करण्यात आली पण आता पवारांचे गोडवे सामनातून गायले जात आहेत. शिवसेनेची आधीची भाषा आणि आताची भाषा पाहिली तर ते समजून येईल, बाळासाहेब ठाकरे असते तर कदापि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले नसते. सामनातूनच उद्धव ठाकरेंवर टीका करतात, महाराष्ट्र सरकारमध्ये संवाद नाही असं स्पष्टपणे शरद पवार म्हणाले. ही मुलाखत राज्याच्या गंभीर परिस्थितीकडून लक्ष विचलित करण्यासाठी घेतलेली आहे, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी घेतलेली मुलाखत आहे असा आरोप नारायण राणेंनी केला.
दरम्यान, देशात सर्वात जास्त अन्य राज्यांपेक्षा रुग्ण महाराष्ट्रात आहे, सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ९ लाख भारतात रुग्ण त्याच्या एक तृतियांश रुग्ण राज्यात आहे, रुग्ण जास्त आणि मृत्यू गाठला त्याबद्दल शरद पवारांना मुलाखतीत प्रश्न का विचारला नाही, शरद पवारही काही बोलले नाहीत, लोकं मृत्युमुखी पडतायेत आणि हसत-खेळत संजय राऊत मुलाखत घेत आहेत. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? याबद्दल कोणी बोलत नाही, हे राज्य कौरवाचं आहे, लवकरच कौरवांचा राज्य जाईल असा दावा नारायण राणेंनी केला.
पाहा व्हिडीओ
अन्य महत्त्वाच्या बातम्या
११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले
खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश
८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!
"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?"; काँग्रेसची थेट नाराजी
निर्दयी! मध्य प्रदेशात पोलिसांनी गरीब शेतकरी दाम्पत्याला बेदम मारलं; लहान मुलांनाही सोडलं नाही