“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:58 PM2021-08-23T22:58:46+5:302021-08-23T23:03:25+5:30
रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी राणे यांची जीभ घसरली.
रायगड: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. (narayan rane make sensational statement while criticized cm uddhav thackeray in jan ashirwad yatra)
“आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाने मोदी, योगी सरकारला फटकारले
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
“दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार
यांना बोलायचा अधिका तरी आहे का?
महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे, असे म्हणत सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.
“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा
मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे
मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एक नवीन शहर विकसीत होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच शाळा, रुग्णालय, कॉलेजही येणार आहे. यामुळे येथील विकासाला गती मिळणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला.
Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, महाड शहराला १९२३ पासून सातत्याने पूर येत आहेत. ही समस्या आजची नाही. पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे काम करेल. त्यासाठी लवकरच दिल्लीत एका बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही देत मी येण्यापूर्वी कृषी मंत्र्यांना भेटलो होतो. त्यांनी ७०० कोटी राज्यसरकारला दिल्याचे सांगीतले. पण ते राज्यसरकारने अद्याप वाटले नाहीत. केंद्रानी पाठवलेली मदत पोहोचत नाही. संकटकाळी सरकारने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे रहायला हवे. राज्यसरकारने ते अद्याप केलेले नाही, असा दावा राणे यांनी केला.