Narayan Rane: नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? नाशिक पोलीस आयुक्तांच्या त्या विधानानंतर भाजपाने केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:43 AM2021-08-26T08:43:22+5:302021-08-26T08:45:43+5:30

Narayan Rane News: नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे.

Narayan Rane: Narayan Rane arrested on Sonia Gandhi's advice? BJP made allegations after that statement of Nashik Police Commissioner | Narayan Rane: नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? नाशिक पोलीस आयुक्तांच्या त्या विधानानंतर भाजपाने केला आरोप 

Narayan Rane: नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? नाशिक पोलीस आयुक्तांच्या त्या विधानानंतर भाजपाने केला आरोप 

googlenewsNext
ठळक मुद्देहा देशपातळीवरचा गेम आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणताहेतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का?राज्याच्या पोलीस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर नारायण राणेंना लगेच जामिनही मंजूर झाला होता. (Narayan Rane) आता नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे. ( Narayan Rane arrested on Sonia Gandhi's advice? BJP made allegations after that statement of Nashik Police Commissioner)

नारायण राणेंवर झालेली अटकेची कारवाई काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांच्या विधानाचा हवाला देत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, हा देशपातळीवरचा गेम आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणताहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? राज्याच्या पोलीस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणीही भातखळकर यांनी यावेळी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झाल्यानंतर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर केला. सुटकेनंतर राणे नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी, माझी मुले मुंबईबाहेर असताना जुहूतील माझ्या घरासमोर जे लोक आले त्यांची माहिती तर मी घेतोच आहे. तुम्हालाही घर, मुलंबाळं नाहीत का? हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला. राणेंच्या बंगल्यासमोर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. तुम्हाला सर्वांनाच मी पुरून उरलो आहे. शिवसेनेला निपटण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. 

Web Title: Narayan Rane: Narayan Rane arrested on Sonia Gandhi's advice? BJP made allegations after that statement of Nashik Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.