Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:07 AM2021-08-25T08:07:18+5:302021-08-25T08:08:13+5:30

Varun Sardesai: वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वासाठी युवासेनेचा आक्रमक पवित्रा. राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यांनी रस्त्यावर ठाण मांडून थेट राणे परिवाराला आव्हान दिले.

Narayan Rane: Rane family was in Konkan, then Varun Sardesai challenge to whom in Mumbai | Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले... 

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले... 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेने मंगळवारी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. राणे विरोधातील आंदोलनात युवासेना आघाडीवर होती. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट राणे यांच्या जुहू येथील घरासमोर राडा केला. त्यामुळे या आंदोलनातून सरदेसाई यांचे नेतृत्व पक्के करण्याची राजकीय खेळी झाल्याची चर्चा आहे.

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार

राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यांनी रस्त्यावर ठाण मांडून थेट राणे परिवाराला आव्हान दिले. या साऱ्या घटनांचे व्हिडीओ तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. सरदेसाई एकटेच अख्ख्या राणे कुटुंबाला भिडल्याचे चित्र यानिमित्ताने तयार झाले. ‘दगड, लाठ्या, बंदुका, काहीपण आणा, उद्धव साहेबांविषयी चुकीचे बोलणाऱ्यांसाठी आमचे हातच काफी आहेत’ या सरदेसाई यांच्या विधानाचे फोटो सोशल मीडियात फाॅरवर्ड केले गेले.

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

मंगळवारी सकाळपासूनच सरदेसाई यांच्या नावाने सेना समर्थकांना मेसेज पाठविले जात होते. ‘प्रत्येक युवासैनिक आज दिसला पाहिजे! मुंबई आमच्या साहेबांची हे दाखवायची आज वेळ आहे’ असे मेसेज फिरविण्यात आले. त्यामुळे या सर्व आंदोलनातून युवासेनेत सरदेसाई यांचे नेतृत्व पक्के झाल्याची चर्चा आहे.  विविध प्रकरणांत सरदेसाई आणि सहकाऱ्यांवर होत असलेली टीका शिवसेनेला अडचणीत आणणारी असल्याचे पक्षातील जुने नेते बोलून दाखवत होते. ही नकारात्मक चर्चा टाळण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने मध्यंतरी सबुरीची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात युवासेना सचिव म्हणून सरदेसाई यांचे राज्यभर सभा, कार्यक्रम घेतले. कोरोना काळातही जिल्ह्याजिल्ह्यात सभा यशस्वी होतील, याची काळजी घेण्याच्या सूचना होत्या. त्यातच आता राणे यांच्याविरोधातील आंदोलनात सरदेसाई यांचा चेहरा पुढे आल्याने सरदेसाई यांची युवासेनेवरील पकड पक्की झाली आहे.

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

आव्हान दिले, पण राणे कुठे होते?
राणे कुटुंबाला घरात घुसून आव्हान देणाऱ्या वरुण सरदेसाई यांना शिवसेनेच्या सोशल मीडियाने डोक्यावर घेतले आहे. पण, राणे कुटुंबीय जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणात होते. जुहूच्या घरी कोणीच नव्हते. मग, अशा वेळी रस्त्यावर बसून कोणत्या राणेंना खाली उतरण्याचे आव्हान दिले गेले, हे शोधावे लागेल, अशी तिरकस टिप्पणी शिवसेनेतील एका जुन्या नेत्याने केली आहे.

Web Title: Narayan Rane: Rane family was in Konkan, then Varun Sardesai challenge to whom in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.