Narayan Rane Live Updates: महाड न्यायालयाने नारायण राणे यांच्यासमोर ठेवल्या काही अटी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:34 AM2021-08-24T11:34:55+5:302021-08-24T23:55:29+5:30

Narayan Rane Live Updates: Narayan Rane vs Shivsena fight over comment against CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणेंनी केलेल्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद

Narayan Rane Shiv Sena fight over comment against CM Uddhav Thackeray Live Updates  | Narayan Rane Live Updates: महाड न्यायालयाने नारायण राणे यांच्यासमोर ठेवल्या काही अटी

Narayan Rane Live Updates: महाड न्यायालयाने नारायण राणे यांच्यासमोर ठेवल्या काही अटी

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर, रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंनी अटक केली आहे. त्यानंतर, राणेसमर्थक आणि भाजपा नेते आक्रम झाल्याचं दिसून येत आहे. 

 Narayan RaneShiv Sena fight over comment against CM Uddhav Thackeray Live Updates

LIVE

Get Latest Updates

11:54 PM

नारायण राणे यांच्या समोर महाड न्यायालयाच्या काही अटी

नारायण राणे यांना जामीन मंजूर केल्यानंतर महाड न्यायालयाने पुराव्यांशी छेडछाड न करणे, तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, रायगड गुन्हे शाखेसमोर दोन सोमवार हजर राहणे अशा सूचना दिल्या आहेत.

11:51 PM

नारायण राणे यांना दोन दिवस रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार

नारायण राणे यांना महाड न्यायालयाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, दोन दिवस रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. 

11:24 PM

भाजपा कार्यकर्त्यांचा न्यायालयाबाहेर जल्लाेष

नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी महाड न्यायालयाबाहेर जल्लाेष साजरा केला.

11:00 PM

नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर

महाड न्यायालयाने पोलिसांचा युक्तीवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.

10:40 PM

महाड न्यायालयातील युक्तीवाद पूर्ण; निकालाची प्रतीक्षा

महाड न्यायालयातील दोन्ही पक्षाकडील युक्तीवाद पूर्ण झाला असून, आता निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

10:34 PM

नारायण राणे यांच्या पत्नी महाड न्यायालयात हजर

महाड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून सुनावणी सुरू असून, नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे न्यायालय परिसरात दाखल झाल्या आहेत.

10:25 PM

महाड न्यायालयात युक्तिवाद सुरू

महाड न्यायलयात दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद सुरू झाला असून, पोलिसांकडून नारायण राणे यांच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

08:45 PM

नारायण राणे महाड पोलीस ठाण्यात दाखल

महाड मध्ये नारायण राणे यांचा ताफा दाखल झाला असून राणे पाेलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. महाडमध्ये भाजपाचे माजी मंत्री  रविंद्र चव्हाण हजर आहेत. 

 

07:24 PM

राणेंच्या अटकेबाबत मंत्र्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल

06:58 PM

वरुण सरदेसाईंविरुद्ध गुन्हा दाखल

युवा सेना सचिव आणि ठाकरे कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाई यांच्याविरुद्ध भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सरदेसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
 

06:50 PM

सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू - भाजपा

06:09 PM

शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा संघर्ष टोकाला

उल्हासनगर-भाजप नगरसेवकावर हल्ला,युवासेना आणि शिवसैनिकांकडून भर रस्त्यात खाली पाडून मारहाण,फासलं काळं

05:20 PM

गृहमंत्री माध्यमांशी संवाद साधणार

नारायण राणे अटक प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे नारायण राणेंना महाडला हलविण्यात आले आहे. त्यामुळे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगडकडे रवाना झाले आहेत.

04:55 PM

तेव्हा औरंगजेबाचे सरकार संपले होते - प्रमोद जठार

जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती थांबलेली आहे. यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही, तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगं या महाराष्ट्रात उभे केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. 

04:47 PM

राणेंना पोलिसांकडून धक्काबुक्की, जेवताना अटक केली - लाड

नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. राणे सध्या आतमध्ये असून त्यांच्यापर्यंत कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्यामुळे, नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

04:38 PM

नारायण राणेंवरील कारवाई सूडबुद्धीने - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. हा नवा महाराष्ट्र आहे, हे नवे हिंदुत्त्व आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 

04:04 PM

नारायण राणे अजून संगमेश्वर पोलीस स्थानकातच; बाहेर लोकांचा मोठा गराडा

नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यातून कुठेही नेऊ देणार नाही; राणेंना हलवल्यास मुंबई-गोवा महामार्ग बंद करू; जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांचा इशारा

03:54 PM

नारायण राणेंबद्दल केलेल्या तक्रारीची पंतप्रधानांकडून दखल- शिवसेना खासदार विनायक राऊत

नारायण राणेंनी केलेल्या विधानाबद्दल मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली. मोदींनी अवघ्या १० मिनिटांत प्रतिसाद दिला. त्यांच्या कार्यालयातून दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी फोन आला. मोदी बैठकीत व्यस्त आहेत. त्यामुळे तुमचं पत्र गृहमंत्री अमित शहांकडे पाठवण्यात आलंय, अशी माहिती पीएमओ कार्यालयानं दिली. त्यामुळे आता राणेंनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- शिवसेना खासदार विनायक राऊत
 

03:48 PM

जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापूर्वी स्थगित

जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापूर्वी स्थगित; भाजप नेते प्रमोद जठार यांची माहिती

03:41 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणेंना अखेर अटक; रत्नागिरी पोलिसांची कारवाई

03:30 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

03:11 PM

नारायण राणेंची प्रकृती बिघडली; रक्तदाब वाढला, तपासणीसाठी डॉक्टर दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची तब्येत बिघडली; रक्तदाब वाढला. तपासणीसाठी सरकारी डॉक्टरांचं पथक दाखल

03:05 PM

नारायण राणे यांच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा

02:57 PM

जळगावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; तुफान राडा

02:51 PM

नारायण राणेंना लवकरच पोलिसांकडून अटक करण्याची शक्यता; हालचाली वाढल्या

रत्नागिरी- संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त; पोलीस अधिकाऱ्यांचा माध्यमांना माहिती देण्यास नकार

02:27 PM

नारायण राणेंना लवकरच अटक होण्याची शक्यता

नारायण राणेंना रत्नागिरीचे पोलीस अटक करणार; त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार

02:23 PM

नारायण राणेंवर अटकेची टांगती तलवार

रत्नागिरीचे पोलीस अधिकारी संगमेश्वरमध्ये नारायण राणेंच्या भेटीला; अटकेची टांगती तलवार कायम

02:07 PM

नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेचा प्लॅन बदलला

 केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी निघालेल्या नाशिक पोलिसांनी प्लॅन बदलला; नाशिक पोलीस आता चिपळूणला न जाता रत्नागिरीत जाऊन नारायण राणे यांना अटक करणार. नारायण राणे यांना आता रत्नागिरीत अटक होण्याची शक्यता 

01:58 PM

नारायण राणेंच्या विधानाला बोलण्यास शरद पवारांचा नकार

नारायण राणेंना महत्त्व देत नाही; शरद पवारांचा राणेंच्या विधानावर बोलण्यास नकार

01:30 PM

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

नारायण राणे पत्रकार परिषदेत १५ ऑगस्टला वर्धापनदिन असतो म्हणतात. मग आता त्यांच्या कानशिलात कोणी मारायची? त्यांच्यासाठी टिवटिव करणाऱ्यांनी समोर यावं. एका तरी शिवसैनिकाच्या केसाला हात लावून दाखवा. मग बघतो काय करायचं- युवासेना सचिव वरुण सरदेसाई

01:27 PM

राणेंच्या 'त्या' विधानाच्या पाठिशी नाही, मात्र पक्ष म्हणून राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

01:17 PM

शिवसेना खासदार संजय राऊतांचं नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर

12:53 PM

रत्नागिरी- जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये; राणेंची शिवसेनेवर घणाघाती टीका

12:43 PM

डोंबिवली: इंदिरा गांधी चौकात शिवसैनिकांनी कोंबड्या उडवून केला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध

12:38 PM

नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

12:30 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं विधान निषेधार्ह; राजकारणाचा नव्हे, तर काही लोकांचा स्तर खालावलाय- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील

12:20 PM

रायगड जिल्ह्यात शिवसेना आक्रमक; दुपारी भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करणार

12:19 PM

ठाण्यातल्या शिवसैनिकांनी मेंटल हॉस्पिटलमधून काढला नारायण राणेंच्या नावाचा केसपेपर; संगमनेरमधील शौचालयात राणेंच्या नावाचा फलक

12:07 PM

मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही, पण ती त्यांची शैली आहे. दरवेळी अनादर करायचा असतो असं नाही. केंद्रीय मंत्र्याला राज्य सरकार अटक करू शकत नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

12:06 PM

उद्धव ठाकरे मोदींना चोर म्हणाले होते त्याचं काय झालं?, चंद्रकांत पाटील यांचा सवाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण एकदा पाहा. मग कुणावर केसेस दाखल व्हायला हव्यात ते ठरवा; पाटील यांचा आक्रमक पवित्रा

12:05 PM

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणं म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल तर कारवाई झालीच पाहिजे- राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक 

12:03 PM

शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. केंद्रात आमचीच सत्ता आहे. यांची उडी कुठपर्यंत जाते ते बघू- केंद्रीय मंत्री नारायण राणे

12:02 PM

केंद्रात आपलं सरकार असल्याचं सांगून नारायण राणे जर राज्यात नंगा नाच घालत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहन करतील असं वाटत नाही. ते नक्कीच राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

12:00 PM

उद्धव ठाकरे आमचे दैवत; देवावर हात उचलण्याची भाषा केली तर युवासैनिक सहन करणार नाही- युवासेना सचिव वरुण सरदेसाई

11:58 AM

नारायण राणेंची मंत्रिपदावरून तत्काळ हकालपट्टी करा; शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

11:54 AM

अहमदनगर- नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांचं आंदोलन

11:50 AM

ठाण्यात शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा

ठाणे : नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलिस स्टेशन येथे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर

Web Title: Narayan Rane Shiv Sena fight over comment against CM Uddhav Thackeray Live Updates 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.