तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:45 PM2021-07-08T16:45:47+5:302021-07-08T16:50:10+5:30

पहिल्याच दिवशी नारायण राणेंचा आक्रमक अवतार; अधिकाऱ्यांची शाळा घेतली

narayan rane slams officers in meeting after taking charge as cabinet minister | तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी

तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. राष्ट्रपती भवनात ४३ जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यानंतर आज नवनियुक्त मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला. लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळालेल्या नारायण राणेंनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे सरकारी बाबूंची भंबेरी उडाली.

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी?; मोदींनी शहांवर सोपवली नवी जबाबदारी

आक्रमक स्वभाळामुळे कायम चर्चेत असलेल्या नारायण राणेंनी आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर राणे कामाला लागले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र अधिकारी बैठकीला तयारी करून आले नव्हते. त्यामुळे राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यामुळे अधिकाऱ्यांची दैना झाली.

पियूष गोयल, स्मृती इराणींना दे धक्का; आणखी एक महत्त्वाचं खातं गुजराती व्यक्तीकडे

मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहेत याची माहिती राणेंनी मागवली. 'मी मंत्रालयात पदभार स्वीकारायला येणार असल्याची कल्पना असतानाही तयारी का केली नाही?' असा सवाल करत राणेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जवळपास १ तास चाललेल्या बैठकीत राणेंनी अर्धा तास अधिकाऱ्यांची शाळा घेतली. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.

नारायण राणेंना लघू, मध्यम उद्योग खातं दिलं. पण त्यांची उंची अजून मोठी आहे, असा खोचक टोला लगावणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत यांना राणेंनी प्रत्युत्तर दिलं. 'कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि खात्याला न्याय देईन, तेव्हा हे खातं किती महत्त्वाचं आहे ते राऊतांना कळेल,' असा प्रतिहल्ला राणेंनी केला.

Web Title: narayan rane slams officers in meeting after taking charge as cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.