मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अन् देशाची माफी मागावी; भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:55 PM2021-08-25T15:55:31+5:302021-08-25T15:58:18+5:30

भाजपा युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवून यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आहे हे सांगणार आहे.

Narayan Rane vs Shivsena: CM Uddhav Thackeray should apologize to Maharashtra - BJP ashish shelar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अन् देशाची माफी मागावी; भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अन् देशाची माफी मागावी; भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवंसरकारविरोधात जनक्षोभ वाढतोय. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकांचं महाराष्ट्रभर आंदोलन अखेर सत्याचाच विजय झाला. राज्य सरकार सारखं कोर्टाच्या थपडा खात आहे

मुंबई – देशाच्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७५ वा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असं विचारणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या व्हिडीओवरुन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात राणेविरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला होता. आता भाजपानं यात समोर येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागितली हवी अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

याबाबत आशिष शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवसेनेला नारायण राणे(Narayan Rane) यांच्या वक्तव्यावर राग नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) स्वातंत्र्यदिनाचं अज्ञान उघड झालं त्याचा थयथयाट आहे. १५ ऑगस्टरोजी महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री हा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव याबाबत अज्ञान जाहीर करतायेत. की जाणुनबुजून केले जातेय की अजाणतेपणे झालंय? १५ ऑगस्ट हा देशवासियांच्या अभिमानाचा दिवस असताना मुख्यमंत्री मुख्य सचिवांना विचारतायेत. हे लपवण्याचा त्यांचा थयथयाट आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं. भाजपा युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवून यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आहे हे सांगणार आहे. त्याचसोबत त्यानंतरही त्यांना आठवत नसेल तर फुलांऐवजी काटे पाठवू. १५ ऑगस्टनंतर काही दुर्देवी घडामोडी घडल्या. सुभाष जाधव या शेतकऱ्याने सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली. २२ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील शिवाजी चिमळकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पालघरमधील काळू पवार यांनी ५०० रुपयांचे कर्ज मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतलं. हे कर्ज फेडलं नाही म्हणून सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारविरोधात जनक्षोभ वाढतोय. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकांनी महाराष्ट्रभर आंदोलन करतात असं असा आरोप आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.

“पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या, मग...”; शेलारांचा शिवसेनेला इशारा

...हा कॉमन संवाद

पुण्यात बोलत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचं काही चुकलं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. 

सत्याचा विजय झाला

तसेच, काल दिवसभर झालेली कारवाई सूडबुद्धीनं झालीय, हे सिद्ध झालं. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असंही सांगितलं. पण, अखेर सत्याचाच विजय झाला. राज्य सरकार सारखं कोर्टाच्या थपडा खात आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.

Web Title: Narayan Rane vs Shivsena: CM Uddhav Thackeray should apologize to Maharashtra - BJP ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.