Narayan Rane vs Shivsena नारायण राणेंच्या अटकेविरुद्ध प्रखर विरोध करा; प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटलांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:18 PM2021-08-24T17:18:42+5:302021-08-24T17:21:20+5:30
नारायण राणे चुकीचे वागले नाहीत. ज्यांना जे करायचं ते करा. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीच पत्रक काढत नारायण राणे यांच्या पाठिशी असल्याचं सांगितले आहे.
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपा प्रखरतेने विरोध करेल. भाजपा कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करेल. ही आंदोलनं इतकी तीव्र असतील की पुन्हा कुणी असं धाडस करू नये. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा देशातील पहिलाचा प्रसंग आहे. अनैसर्गिक पद्धतीने आलेले सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन पक्षांनी अतिशय प्लॅनिंगनं शिवसेना-भाजपात वैर निर्माण करण्याचं काम केले हे उद्धव ठाकरेंना कळत नाही. हा आनंद सरकारमधील दोन पक्षांना मिळवून देण्यामागे उद्धव ठाकरेंचाही सहभाग आहे. प्रत्येकाची आपली एक शैली असते. भारतीताई, कपिल पाटील, भागवत कराड यांच्याप्रमाणे नारायण राणेंचा एक स्वभाव आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. परंतु कॅबिनेट मंत्र्याला अशाप्रकारे अटक केली जातेय हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/XmiXFuFf5h
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 24, 2021
अमित शाह यांनी नारायण राणे यांना फोन करुन संपूर्ण पक्ष तुमच्या पाठिशी आहे असं आश्वासन दिले आहे. नारायण राणे कुठेही सुसंस्कृतेला धक्का पोहचेल असं वागत नाही. भाजपा खूप मोठा पक्ष आहे. भाजपात वाढत चालली आहे. अनेकजण पक्षाशी जोडले जात आहेत. राज्यपालांना, पंतप्रधानांना काहीही बोलले तर चालतं का? दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकवा. त्यात लाठ्या-काठ्या हिंसा वापरणारी भाषा होती. नारायण राणेंकडून जर वक्तव्य झालं असेल तर पोलिसांनी समज देणारी नोटीस पाठवली का? नारायण राणेंच्या यात्रेला प्रतिसाद मिळत होता त्या प्रतिसादाला घाबरून सुडापोटी राणेंवर कारवाई केली आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
वरुण सरदेसाईंची आंदोलनावेळी मुंबई पोलिसांना शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल
नारायण राणे चुकले नाही, ज्यांना जे करायचं ते करा
राज्याचे संविधानिक प्रमुख राज्यपाल असतात. राज्यपालांना जे जे शब्द वापरता ते चालतं?. पंतप्रधानांना बडवलं पाहिजे. चोर म्हणता ते चालतं. भारतीय जनता पार्टी अनेकांना सामावून घेत आहे. अन्याय सहन करणार नाही असा राणेंचा स्वभाव आहे. त्यामुळे जशाच तसं हे त्यांचे उत्तर असतं. नारायण राणे यांच्यामुळे पक्षाला आक्रमक चेहरा मिळाला पण ते एकटेच नाही अनेक आक्रमक चेहरे भाजपाकडे आहेत. नारायण राणे चुकीचे वागले नाहीत. ज्यांना जे करायचं ते करा. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीच पत्रक काढत नारायण राणे यांच्या पाठिशी असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी देशातील प्रत्येक नागरिक उभा आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
थेट राणे कुटुंबाला भिडणारा शिवसेनेचा नवा वाघ; कोण आहे आक्रमक चेहरा?
पक्षाचे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन देणार
नारायण राणे यांच्याबद्दल पोलीस वागणूक पाहता पक्षाचे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांकडे निवेदन देणार आहेत. लोकप्रतिनीधी म्हणून ज्याप्रकारे पोलिसांकडून वागणूक दिली जातेय. त्याबद्दल निवेदनातून भूमिका मांडणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'
नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. राणे सध्या आतमध्ये असून त्यांच्यापर्यंत कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्यामुळे, नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.