Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:05 PM2021-08-24T14:05:15+5:302021-08-24T14:05:51+5:30

Narayan Rane News: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did | Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Narayan Rane: नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांना अटकेची कारवाई सुरू केल्याने राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. एकीकडे शिवसैनिक नारायण राणेंविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्यापासून अंतर राखत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामागे ठामपण उभे राहणार असल्याचे स्पष्ट केली आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचे काय होणार अशी विचारणा होत आहे. दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. (Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did)

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांच्याविरोधात सरकार ज्याप्रकारे कारवाई करत आहे. त्याचंही समर्थन करता येणार नाही. भाजपा नारायण राणेंच्या वक्तव्याच्या मागे उभा नसला तरी पक्ष भाजपाच्या मागे उभा आहे. यावेळी नारायण राणेंना अटक झाल्यास जनआशीर्वाद यात्रेचा काय होणार, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंना अटक झाली म्हणून जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील. जनआशीर्वाद यात्रा रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

यावेळी परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रूपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

Web Title: Narayan Rane: What will happen to Jana Aashirwad Yatra if Narayan Rane is arrested? Devendra Fadnavis clearly stated what he did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.