नारायण राणेंचा शिवसेना आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जिप अध्यक्ष निवडणुकीत भाजपाची बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 04:45 PM2021-03-24T16:45:42+5:302021-03-24T16:53:56+5:30

Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi : नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. आताही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या मदतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

Narayan Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi, BJP's Sanjana Sawant wins Sindhudurg zip president election | नारायण राणेंचा शिवसेना आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जिप अध्यक्ष निवडणुकीत भाजपाची बाजी 

नारायण राणेंचा शिवसेना आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जिप अध्यक्ष निवडणुकीत भाजपाची बाजी 

Next

सिंधुदुर्गनगरी - भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena)आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार संजना सावंत (Sanjana Sawant) यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करत बाजी मारली आहे.  (Narayan Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi, BJP's Sanjana Sawant wins Sindhudurg zip president election)

नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. आताही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या मदतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. 

दरम्यान, आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून संजना सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेनेने वर्षा कुडाळकर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना ३० विरुद्ध १९ अशा ११ मतांच्या फरकाने पराभूत केले. जिल्हा परिषदेमध्ये आज सदस्यांकडून हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाल्याने जिल्ह्यातील राजकारणावर नारायण राणेंचे असलेले वर्चस्व निर्माण झाले आहे. 

Web Title: Narayan Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi, BJP's Sanjana Sawant wins Sindhudurg zip president election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.