Narendra Modi: मास्टरस्ट्रोक! बेरोजगार भक्तानं उघड केलं नरेंद्र मोदींच्या कामगिरीची ४२० रहस्य; ५६ पानी कोरं पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 07:51 AM2021-05-27T07:51:02+5:302021-05-27T08:25:54+5:30

या पुस्तकाचं नाव ‘मास्टरस्ट्रोक’ (Masterstroke) असं लिहिलं असून त्याचे लेखक बेरोजगार भक्त या टोपणनावानं प्रकाशित करण्यात आलं आहे.

Narendra Modi: ‘Berozgar Bhakt’ reveals ‘420 secrets that helped PM in India's employment growth’ | Narendra Modi: मास्टरस्ट्रोक! बेरोजगार भक्तानं उघड केलं नरेंद्र मोदींच्या कामगिरीची ४२० रहस्य; ५६ पानी कोरं पुस्तक

Narendra Modi: मास्टरस्ट्रोक! बेरोजगार भक्तानं उघड केलं नरेंद्र मोदींच्या कामगिरीची ४२० रहस्य; ५६ पानी कोरं पुस्तक

Next
ठळक मुद्देभारताच्या रोजगार वाढीसाठी मदत करणारं पंतप्रधानांची ४२० रहस्य याबाबत उघड करणारं पुस्तक असल्याचं सांगितलं गेलं५६ पानांच्या या पुस्तकात सगळी पानं कोरी ठेवण्यात आली आहेत. ते किंडल डाऊनलोड करता येईल काहीतरी नवं करून लोकांना हसवण्यासाठी मी १५ मिनिटाच्या संकल्पनेत हे पुस्तक तयार केले

नवी दिल्ली – सध्या देशात सोशल मीडियावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. पंतप्रधान मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस(Congress) टूलकिटचा(Toolkit) वापर करत असल्याचा आरोप भाजपाने(BJP) केला आहे. त्यानंतर गुरुवारी जगप्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवरील एका पुस्तक विक्रीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

कोरोना काळात लोकांनी नोकऱ्या गमावल्या यावरून अमेझॉनवर उपहासात्मक पुस्तक विक्रीला ठेवलं होतं. यात बेरोजगारी राखण्यासाठी पंतप्रधानांची कामगिरी यावर हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव ‘मास्टरस्ट्रोक’ (Masterstroke) असं लिहिलं असून त्याचे लेखक बेरोजगार भक्त या टोपणनावानं प्रकाशित करण्यात आलं आहे. अमेझॉनच्या वेबसाईटवर कित्येक वेळ हे पुस्तक विक्रीला ठेवलं होतं. त्यात नरेंद्र मोदींच्या फोटोचं मुखपृष्ठ होतं. “मास्टरस्ट्रोक 420 secrets that helped PM in India's employment growth” या नावानं  भारताच्या रोजगार वाढीसाठी मदत करणारं पंतप्रधानांची ४२० रहस्य याबाबत उघड करणारं पुस्तक असल्याचं सांगितलं गेलं.

ह्दयद्रावक घटना! कारच्या सीटवर मुलीचा मृतदेह बांधून हतबल बापाला करावा लागला ८० किमी प्रवास

५६ पानांच्या या पुस्तकात सगळी पानं कोरी ठेवण्यात आली आहेत. ते किंडल डाऊनलोड करता येईल आणि त्याची किंमत ५६ रुपये ठेवण्यात आली आहे. देशातील बेरोजगारीच्या वाढत्या लाटेला बळी पडलेल्या भक्तानं लिहिलेलं पुस्तक असल्याचं दाखवलं गेले. माहितीनुसार हे पुस्तक झारखंडमधील एका इंजिनिअरनं बेरोजगारीमुळे ही कल्पना सुचल्याचं म्हटलं आहे. किंडल पब्लिकेशन कसे काम करते हे तपासण्यासाठी हे केलं. काहीतरी नवं करून लोकांना हसवण्यासाठी मी १५ मिनिटाच्या संकल्पनेत हे पुस्तक तयार केले आणि अमेझॉनवर विक्रीसाठी ठेवलं. त्यानंतर वेबसाईटनुसार अमेझॉनवर युजर्सला काही पुस्तकं मिनिटांसाठी प्रकाशित करता येतात. अमेझॉन साईटवर ते २ दिवस विक्रीला ठेवता येते. आता हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध नाही असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

मास्टरस्ट्रोक बाबत काय लिहिलंय?

जेव्हा देश कोरोनाच्या संकटात लढाई करत होता, देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्या नेतृत्वामुळे रोजगारवाढीस मदत मिळाली. हे पुस्तक वाचकांना मोफत उपलब्ध करण्यात आलं होतं. काही तासांत किमान ५७ जणांनी या पुस्तकाला टॉप रेटिंग दिलं. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका युजरनं म्हटलंय की, मास्टरफूल, आमच्या सन्मानीय पंतप्रधानांनी उचललेली पाऊलं आणि त्यामुळे भारतीयांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या. त्यांनी घेतलेलं कष्ट याबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे. सुरुवातीला अमेझॉनवर लेखकाने नरेंद्र मोदींचा फोटो स्पष्ट दिसेल असा लावला होता परंतु त्यानंतर कॉपीराईटमुळे तो ब्लर करण्यात आला.

Read in English

Web Title: Narendra Modi: ‘Berozgar Bhakt’ reveals ‘420 secrets that helped PM in India's employment growth’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.