Cabinet reshuffle: महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला दिल्लीतून बोलावणे; मराठवाड्यात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:03 IST2021-07-07T10:39:26+5:302021-07-07T11:03:06+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle: राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे.

Cabinet reshuffle: महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला दिल्लीतून बोलावणे; मराठवाड्यात चर्चांना उधाण
Modi Cabinet Expansion: मुंबई : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) आज सायंकाळी ६ वाजता केला जाणार आहे. मोदींनी आजची कॅबिनेट बैठक रद्द केली असून ज्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत त्यांना दोन दिवसांपासून दिल्लीला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे राज्याचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) हे कालच सपत्नीक दिल्लीला गेले आहेत. राज्यातून दोन की चार नेत्यांना मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चांना उधाण आलेले असताना बंजारा समाजाचे नेते आणि राज्यसभा खासदार भागवत कराड (Bhagvat karad) यांना देखील आज दिल्लीवरून बोलावणे आल्याचे सुत्रांनी सांगितले. (Bhagvat karad will get cabinet post in Modi Cabinet Expansion today.)
राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे.
भागवत कराड हे मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना गेल्या वर्षी राज्यसभेवर घेण्यात आले होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बंजारा समाजाचे नेते म्हणून भागवत कराड यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्यात सध्या मराठा आंदोलनाचा विषय तापलेला आहे. यामुळे नारायण राणे आणि बंजारा समाजाचे नेते भागवत कराड यांच्या पारड्यात मंत्रिपद देवून जातीची समीकरणे बांधली जाण्याची शक्यता आहे. भागवत कराड यांना बोलावणे आल्याने प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.
सर्व नेते दिल्लीत
ळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.