Cabinet reshuffle: मोदींनी घेतला महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा राजीनामा; दुसरे तातडीने दिल्लीला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:36 PM2021-07-07T14:36:23+5:302021-07-07T14:53:46+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle, Raosaheb Danve resign?: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांचा समावेश आहे.
Modi Cabinet Expansion: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचाही (Sanjay Dhotre) समावेश आहे. याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडेदेखील राजीनामा मागितल्याची चर्चा असून ते तातडीने दिल्लीला निघाले आहेत. (central ministers Sanjay Dhotre resigned from the modi Cabinet; Raosaheb Danve in Flight on the way of Delhi )
रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.
Cabinet reshuffle: नितेश राणे दिल्लीत, नारायण राणे मोदींच्या भेटीला; दिल्लीत हालचालींना वेग
काल एका मंत्र्याला राज्यपालपद...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल (Governor) बनविण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
महाराष्ट्रातील भाजपाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याने आता त्यांच्या जागी महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना स्थान मिळणार की अन्य कोणत्या नेत्याला हे मंत्रिपद जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. अकोल्यातील खासदार संजय धोत्रे मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवेंकडे राजीनामा मागितला (Raosaheb Danve resign?) की त्यांची बढती होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे सुत्रांनी सांगितले.
सर्व नेते दिल्लीत
मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील, भागवत कराड दिल्लीत आहेत.