Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:17 AM2021-07-08T09:17:22+5:302021-07-08T09:20:30+5:30

Narendra Modi Cabinet Reshuffle: नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

Narendra Modi Cabinet Reshuffle: Nitish Kumar demand 3 ministerial posts, modi gave one; because of Chirag paswan | Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

Modi Cabinet News: ३ मंत्रिपदे मागितलेली, मोदींनी एकच दिले; नितीश कुमार तरीही खूश?

Next

Cabinet expansion: नवी दिल्ली: बिहार निवडणुकीत कमी जागा निवडून आल्या तरीदेखील नितीश कुमार (Nitish Kumar) यांना भाजपाने मुख्यमंत्री पदी ठेवले होते. बिहारमध्ये (Bihar Politics) तापलेले कुरघोडीचे वातावरण शमले आहे. परंतू, कालच्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येनितीश कुमार सहभागी होणार की नाही यावरून संभ्रम होता. कारण नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) तीन मंत्रिपदे देण्याची अट ठेवली होती. मात्र, मोदींनी त्यांना एकावरच समाधान मानायला लावले आहे. तरीदेखील नितीश कुमार नाराज नाही तर खूश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Nitish kumar's party JDU got 1 minister post in modi cabinet expansion, they want 3.)

Cabinet reshuffle: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज मोठी बैठक; मंत्रीदेखील पदभार स्वीकारणार

नितीश कुमार स्वत:च सांगतात, जेव्हा ते पुड्या बांधून फेकतात तेव्हा त्या उघडत नाहीत. मग त्यांनी २०१९ मध्ये एक मंत्रिपद मिळत असल्याने नाराजी व्यक्त करून मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, तेच सांकेतिक पद त्यांना दोन वर्षांनी मान्य झाले आहे, यामागे मोठे कारण आहे. 

मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारानंतर नितीश कुमारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. नितीश यांनी चिराग पासवानला दुसरा झटका देण्यासाठी दोन मंत्रिपदांचा बळी दिल्याचे म्हटले जात आहे. पशुपति पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हाच नितीश यांनी चिराग पासवानना पहिला झटका दिला होता. 

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री

पारस यांना केंद्र सरकारमध्ये सहभागी करण्याचा सरळ अर्थ असा होता की, भाजपाने पारस यांच्या नेतृत्वातील एलजेपीला स्वीकारले आहे. नितीश कुमारांनादेखील हेच हवे होते. बिहार विधानसभा निवडणुकीत चिरागमुळे नितीश कुमारांना २० जागा गमवाव्या लागल्या होत्या. याचा बदला त्यांना घ्यायचा होता. मात्र, चिराग पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत त्याची ढाल बनवून नितीश कुमारांसमोर उभे ठाकत होते. यामुळे पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा नितीश कुमार यांचाच विजय मानला जात आहे. 

हार के भी जीत....
एक फिल्मी डायलॉग आहे, 'हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं'. चिराग पासवानला दोन झटके देण्यासाठी नितीश कुमारांनी दोन मंत्रिपदांवर पाणी सोडले. हरूनही जिंकल्याची भावना आता नितीश कुमारांच्या गोटात आहे. 

२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्व
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

१२ मंत्र्यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.

Web Title: Narendra Modi Cabinet Reshuffle: Nitish Kumar demand 3 ministerial posts, modi gave one; because of Chirag paswan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.