Cabinet Reshuffle: ठरलं!; मोदी मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर; महाराष्ट्राचा 'चौकार'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 04:22 PM2021-07-07T16:22:02+5:302021-07-07T16:51:16+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle: नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. ५० वर्षापेक्षा कमी असलेल्या १४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे.
नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार अखेर दिल्लीत पार पडत आहे. आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कॅबिनेट विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेट विस्तारात १० मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले असून मंत्रिमंडळात ३३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न
कॅबिनेटच्या नव्या विस्तारात ओबीसी आणि एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स(ST) समाजातील आहेत.
५ मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील आहे. यात मुस्लीम १, शिख १, बौद्ध २ आणि १ ईसाई धर्मातील आहे. त्याशिवाय २९ ब्राह्मण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत. यातील २ महिलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. ५० वर्षापेक्षा कमी असलेल्या १४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यातील ६ जणांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाईल. कॅबिनेट विस्तारानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ इतकं असेल.
‘ही’ आहे ४३ मंत्र्यांच्या नावाची यादी
१. नारायण राणे
२. सर्बांनंद सोनोवोल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंग
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपति कुमार पारस
८. किरण रिजाजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मनसुख मंदाविया
१२. भूपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपेला
१४. जी. किसन रेड्डी
१५. अनुराग सिंग ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया सिंग पटेल
१८. सत्यपाल सिंग बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करांडलाजे
२१. भानूप्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मीनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणस्वामी
२६. कौशल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिंह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. डॉ. सुभाष सरकार
३५. डॉ. भागवत कराड
३६. डॉ. राजकुमार सिंह
३७. डॉ. भारती पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
४१. जॉन बारला
४२. डॉ. एल. मुरुगन
४३. निसिथ प्रामाणिक
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021