Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:37 PM2021-07-08T13:37:07+5:302021-07-08T13:38:49+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle, Nitin Gadkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले आणि नेकऱ्यांचे सवाल सुरु झाले.
Narendra Modi Cabinet Reshuffle: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. १२ मंत्र्यांचे राजीनामे घेताना त्यात काही महत्वाचे चांगले काम करणारे मंत्री असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचे नाव आहे. याचबरोबर मोदींनी त्यांच्य मंत्रिमंडळातील हेवी वेट नेते नितीन गडकरींच्या (Nitin gadkari) देखील खात्यांना हात लावल्याने नेटकऱ्यांनी असे का केले, असा सवाल केला आहे. (People reaction on Nitin gadkari MSME transfer to Narayan Rane twitter.)
Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले. नारायण राणे यांना कोणते मंत्रालय देणार यावर मोठी चर्चा रंगली होती. आज नारायण राणे यांनी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. परंतू ही बाब नेटकऱ्यांना काही पटलेली दिसत नाहीय. चांगले प्रदर्शन करूनही गडकरींचे खाते कमी केल्याने नेटकऱ्यांनी असे का केले असा सवाल मोदींना विचारण्यास सुरुवात केली आहे.
गडकरी फक्त मोदी सरकारमध्येच नाहीत तर भारतात सर्वकालीन चांगले प्रदर्शन करणाऱ्या मंत्र्यांमध्ये मोडतात. यामुळे त्यांना अर्थ, संरक्षण किंवा आरोग्य खाते दिले जाण्याची अपेक्षा होती. परंतू ते झाले नाहीच, तर त्यांच्याकडील एक महत्वाचे मंत्रालय काढून घेण्यात आले आहे, असे एका युजरने म्हटले आहे.
I was hoping that Nitin Gadkari would get additional charge as well. Like give him all ministeries that's transport/logistics related. Surprised that it didn't happen.
— Dileepan M (@iDileepan) July 8, 2021
दुसऱ्या युजरने तर आम्हाला वाटले होते, गडकरींकडे आणखी मंत्रालये देण्यात येतील. जसे की ट्रान्स्पोर्ट, लॉजिस्टिक्सशी संबंधीत. परंतू आश्चर्य आहे असे नाही झाले, असे म्हटले आहे.
One of the best Ministers in this Govt is @nitin_gadkari . Yet he hasn't been given any big Ministry in this reshuffle.
— Sumanth Raman (@sumanthraman) July 7, 2021
राजकीय विश्लेषक सुमंथा रामन यांनी म्हटले की, गडकरी या सरकारमधील एक चांगले मंत्री आहेत. फेरबदलात त्यांना नवीन मोठे मंत्रालय देण्यात आले नाही. तर आणखी एक युजर उप्पू सिंगने म्हटले की नितीन गडकरींसाठी चांगला निर्णय, ओझे हलके झाले.
अन्य एक युजर बलबीर याने म्हटले की, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हात लावला जाणार नाही असे वाटलेले. तर आणखी एक युजर अभिलास यांने नितीन गडकरींना गृह मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार द्यायला हवा होता, असे म्हटले आहे.