नरेंद्र मोदी हे खतरनाक दहशतवादी, टीका करताना चंद्राबाबूंची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:49 IST2019-04-03T15:48:24+5:302019-04-03T15:49:35+5:30

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.

Narendra Modi is a dangerous terrorist, criticizing Chandrababu's | नरेंद्र मोदी हे खतरनाक दहशतवादी, टीका करताना चंद्राबाबूंची जीभ घसरली

नरेंद्र मोदी हे खतरनाक दहशतवादी, टीका करताना चंद्राबाबूंची जीभ घसरली

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनीही एका प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतरनाक दहशतवाद्याची उपमा दिली आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कट्टर दहशतवादी संबोधलं आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवशी केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना चंद्राबाबूंनी मोदींची कट्टर दहशतवाद्याची तुलना केली आहे. मदनापल्ले येथे एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, मोदी एक खतरनाक दहशतवादी आहेत. ते योग्य व्यक्ती नाहीत. इथे माझे अल्पसंख्याक भाऊही उपस्थित आहेत. जर तुम्ही पुन्हा मोदींना मतदान केलं, तर तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. गोध्रा कांडवेळीसुद्धा 2 हजारांहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. मी तेव्हाच सांगितलं होतं की, मोदी देशासाठी घातक आहेत. म्हणून मी अशी पहिली व्यक्ती होतो, ज्यांनी मोदींची साथ सोडून एनडीएला सोडचिठ्ठी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींनी चंद्राबाबूंवरही टीका केली होती. मोदींनी या प्रचार सभेत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंवरही निशाणा साधला होता. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना प्रसिद्ध चित्रपट असलेल्या बाहुबलीतल्या भल्लालदेवशी केली होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्वतःच्याच घरात ठेवायची आहे, अशी टीकाही मोदींनी केली होती. चंद्राबाबू नायडू हे बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवसारखेच आहेत. तसेच त्यांनी अनेक लोकांची माहिती चोरल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.  

Web Title: Narendra Modi is a dangerous terrorist, criticizing Chandrababu's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.