त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता : नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:16 PM2021-05-23T18:16:14+5:302021-05-23T18:22:35+5:30

Nawab Malik on PM Narendra modi : खरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे, मलिक यांचे वक्तव्य.

nawab malik slams pm narendra modi coronavirus conditions felt bad cried no mask in meeting | त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता : नवाब मलिक 

त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता : नवाब मलिक 

Next
ठळक मुद्देखरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे, मलिक यांचे वक्तव्य.मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे : नवाब मलिक

"मुख्यमंत्र्यांसोबत स्वतच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही आणि परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. 

"देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला. औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले की ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत," असे नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

मोदी झाले होते भावूक

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते.

Web Title: nawab malik slams pm narendra modi coronavirus conditions felt bad cried no mask in meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.