“भाजपमधील काहींचे मानसिक संतुलन बिघडलेय, पडळकर त्यातीलच एक”; राष्ट्रवादीचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:43 PM2021-06-30T19:43:36+5:302021-06-30T19:47:48+5:30

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ncp amol mitkari replied gopichand padalkar on sharad pawar criticism | “भाजपमधील काहींचे मानसिक संतुलन बिघडलेय, पडळकर त्यातीलच एक”; राष्ट्रवादीचा पलटवार

“भाजपमधील काहींचे मानसिक संतुलन बिघडलेय, पडळकर त्यातीलच एक”; राष्ट्रवादीचा पलटवार

Next
ठळक मुद्देपडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तरभाजपमधील काहींचे मानसिक संतुलन बिघडलेय, पडळकर त्यातीलच एकराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी साधला निशाणा

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपमधील काहींचे मानसिक संतुलन बिघडलेय, पडळकर त्यातीलच एक आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे. (ncp amol mitkari replied gopichand padalkar on sharad pawar criticism)

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना, शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

“सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या ठाकरे सरकारने परिणाम भोगायला तयार राहावे”

बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं

ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचे आत्मचिंतन भाजपने करावे, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. 

“नवज्योतसिंग सिद्धू हे एक भरकटलेलं मिसाइल”; शिरोमणी अकाली दलाची टीका

केंद्र सरकारच्या अनेक वल्गना आतापर्यंत फसव्या ठरल्या

केंद्र सरकारच्या अनेक वल्गना आतापर्यंत फसव्या ठरल्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटी परतावा अद्याप दिलेला नाही. महाराष्ट्रात त्यांची सत्ता नसल्यामुळेच केंद्र सरकार अशा पद्धतीने वागत असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसेच अमित शहा हे चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही. महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

दरम्यान, शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचे देणंघेणं नाही. ही लोकशाही आहे. या राज्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत जाणे हे माझे काम आहे. मला ओबीसींचा नेता म्हणावे असे माझे म्हणणे नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
 

Web Title: ncp amol mitkari replied gopichand padalkar on sharad pawar criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.