Anil Deshmukh Resigned : "वेदनादायी... आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 05:03 PM2021-04-05T17:03:28+5:302021-04-05T17:11:37+5:30
NCP Amol Mitkari Slams BJP Over Anil Deshmukh Resigned : आपण राजीनामा दिल्याचे स्वत: अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करुन सांगितले.
मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणावर अँड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे. आपण राजीनामा दिल्याचे स्वत: अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करुन सांगितले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपावर (BJP) टीकास्त्र सोडलं आहे.
"वेदनादायी, आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिलं गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला" असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. वेदनादायी" असं मिटकरींनी म्हटलं आहे.
गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले.भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला.वेदनादायी.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 5, 2021
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी लागल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी राजीनाम्याचे पत्रही शेअर केले आहे.
भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडलं असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!" असं शेलार यांनी म्हटलं आहे.
"राज्यातील आघाडी सरकारचं पितळ पूर्णपणे उघडं पडलं, महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली... याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!"https://t.co/4H1c0Csaxa#BJP#AshishShelar#ThackerayGovernment#AnilDeshmukh#ParamBirSingh#Maharashtra#MaharashtraGovernment@ShelarAshishpic.twitter.com/mLktMxz3ub
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2021